vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ग्रंथ पूजनाने ठाणे ग्रंथोत्सव 2024 चे उद्घाटन संपन्न…

ग्रंथ पूजनाने ठाणे ग्रंथोत्सव 2024 चे उद्घाटन संपन्न…

 

ठाणे, प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने “ठाणे ग्रंथोत्सव 2024” चे आयोजन कोपरखैरणे येथील ज्ञान विकास संस्था येथे करण्यात आले आहे. या भव्य ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपूजन करून आज करण्यात आले.

यावेळी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, ज्ञान विकास संस्थापक अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड पी.सी.पाटील, प्रा.माणिकराव कीर्तन वाचनालय वाशीचे सुभाष कुळकर्णी, ज्ञान विकास संस्थेचे उपध्याक्ष राम पाटील, जेष्ठ संचालक अशोक पाटील, श्री.सोन कांबळे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी संचालक देवेंद्र भुजबळ, जेष्ठ कवी अरुण म्हात्रे, ठाणे जिल्हा ग्रंथाचे अध्यक्ष चांगदेव काळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्ञान विकास संस्थेचे प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक, डी. व्ही. एस. इंग्रजी प्राथमिक माध्यमिक, डी. एस. महाविद्यालय, डी. व्ही. एस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड. पी. सी. पाटील विधी महाविद्यालयचे विद्यार्थी या ग्रंथोत्सव दिंडी मध्ये सहभागी झाले होते. तसेच या ग्रंथोत्सव दिंडी नवी मुंबई महानगरपालिका परिमंडळ – 2 उप आयुक्त कैलास गायकवाड, प्रा.माणिकराव कीर्तन वाचनालय, वाशीचे सुभाष कुलकर्णी, ज्ञान विकास संस्था कोपरखैरणेचे संस्थापक – अध्यक्ष पी. सी. पाटील, ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील तसेच शाळा कॉलेजचे प्राचार्य व शिक्षक सहभागी झाले होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ज्ञान विकास संस्थापक अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड पी.सी.पाटील म्हणाले की, शासनाच्या सर्व कार्यक्रमांना आमच्या विद्यालयाकडून प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न करतो. आमच्या विद्यालयातील सर्व विद्यार्थी कमीत कमी एक पुस्तक खरेदी करतील. वाचन चळवळ वाढविण्यासाठी हे आवश्यक आहे. ग्रंथ समाजाला दिशा देण्याचे काम करतात. स्वतःला अद्यावत ठेवणे, स्पर्धेत टिकून रहाणे यासाठी वाचनाला पर्याय नाही. वाचनामुळे विचारात प्रगल्भता येते. नवे विचार मांडून समाजाला दिशा देणे हे ग्रंथाचे काम आहे. शासनाच्या कोणत्या उपक्रम राबविण्यासाठी हे विद्यालय नेहमी सहकार्य करेल.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर म्हणाले की, या ग्रंथोत्सवमधून आपल्या ज्ञानाचे खाद्य आपल्याला मिळणार आहे. आपण खूप भाग्यवान आहात इतका मोठा कार्यक्रम आपल्या शहरात होत आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या पालकांना सुध्दा घेवून या. आपल्या आवडणाऱ्या लेखाचे एकतरी पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याने वाचायला पाहिजे. ही पुस्तक आपण व पालकांनी तसेच शिक्षकांनी खरेदी करावी. वाचनाची आवड वाढली पाहिजे, यासाठी शासनाने आता वाचन प्रकल्प हाती घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे पुस्तक एक तास वाचले पाहिजे. तुम्ही काय वाचले आहे, याचे परीक्षण आपल्या हाताने लिहायचे आहे. ते परीक्षण आपल्या महाविद्यालयामध्ये जमा करायचे आहे. ही संकलित माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. शासन यातून चांगले वाचक विद्यार्थ्यांना पारितोषिक देणार आहे. 1 ते 15 जानेवारी मध्ये या वाचन साप्ताह राबविण्यात येत आहे, यामध्ये आपण सहभागी व्हावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह व प्रसन्ना पाटील यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.मंगळवार, दि.31 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 11:30 या कालावधीत संगीतवर्षा कला प्रतिष्ठान प्रस्तुत “गाथा शिवकालीन इतिहासाची”या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11:30 ते 01 या कालावधीत “अभिजात मराठी भाषा ज्ञानभाषा कशी बनेल?” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 03 ते 4:30 या कालावधीत “क-कवितेचा”या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 4:30 ते 06 या कालावधीत ज्ञान विकास संस्था, कोपरखैरणे यांच्या कोळीगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. सायंकाळी 06 ते 07 या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील आदर्श ग्रंथपालांचा व उत्कृष्ट वाचकांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी, ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रंथप्रेमींनी या ग्रंथोत्सवास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील व सूत्रसंचालन संतोष जाधव तर आभार प्रदर्शन प्रतिभा पाटील यांनी केले.00000

संबंधित पोस्ट

राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ८५ वर्षांहून अधिक वयोगटामधील एकूण १२ लाख ४० हजार ९१९ मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी.

vishwatmaklokswamivarta

घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यात लवकरच नवे धोरण– मंत्री उदय सामंत

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार गावे पाणीदार बनवा; जनजागृतीसाठी ‘जलरथ’ रवाना..

अहिल्यानगरात मानव – बिबटे संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून दैनंदिन आढावा

vishwatmaklokswamivarta

रास्त भाव दुकानदारांना कमिशन मोबदला वाढवून देण्यास सरकार सकारात्मक – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

विशेष लेख -:तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची ज्येष्ठ नागरिकांची इच्छाशासन करणार पूर्ण