vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा राखणे हे कायद्याने बंधनकारक आहे. कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत यासंदर्भात एक जिल्हास्तरीय समिती तयार करुन या समितीने सर्व आस्थापनांमध्ये तपासणी पाहणी करावी व तसा अहवाल दरमहा सादर करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे दिले.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे होते. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक प्र.वि. सुरसे, उपसंचालक धिऱा. खिरोडकर, सहा. संचालक श्रीमती गायकवाड, ग.बा. पाचवणे, कामगार कल्याण अधिकारी चंद्रकांत राऊत यावेळी उपस्थित होते.महाराष्ट्र कारखाने नियम व महाराष्ट्र कारखाने नियम २००३ अन्वये कारखान्यांचे कामकाज व कामगारांची सुरक्षा याबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजना व आवश्यक तपासण्या व कारवाई बाबत माहिती देण्यात आली. धोकादायक व अतिधोकादायक कारखान्यांमधील कामगारांची सुरक्षा वेळोवेळी तपासणी होणे आवश्यक असून कामगार व औद्योगिक सुरक्षा अधिनियमानुसार ते बंधनकारकही आहे. याबाबत कामगारांमध्ये तसेच आस्थापना चालकांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबवावे. कामगारांना आपल्या सुरक्षा उपाययोजनांविषयी प्रशिक्षित करावे. याबाबत प्रत्येक आस्थापनेत होत असलेल्या सुरक्षा उपाययोजनांच्या अंमलबजावणीच्या तपासणीसाठी एका समितीचे गठन करावे व त्या समितीने आपला अहवाल दरमहा सादर करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले

संबंधित पोस्ट

छत्तीसगड | दंतेवाडा जिल्ह्यात १२ माओवादी कार्यकर्त्यांनी शरणागती पत्करली, ९ माओवादी कार्यकर्त्यांवर एकूण २८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते.

महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरावर भगवा ध्वज फडकवला…

vishwatmaklokswamivarta

मांग-मातंग समाजासाठी योजनांची माहिती देणारी कार्यशाळा ११ मे रोजी 📢📚

संस्कारक्षम अशा बालवयातच पालकांनी पाल्यावर लक्ष द्यावे-: अश्विनी पांचाळ मानसिक दृष्ट्या सक्षम व्हा, कुठलाही तणाव घेऊ नका-: मानसी नोपानी

vishwatmaklokswamivarta

राजमाता जिजाऊ यांचा ४२७ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते महापुजा जय जिजाऊ…जयघोषाने दुमदुमले मातृतीर्थ!

vishwatmaklokswamivarta