vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

योजनेसाठी जमीन खऱेदी करणार : समाजकल्याण कार्यालय जमीनविक्रीस इच्छूकांनी प्रस्ताव देण्याचे आवाहन

योजनेसाठी जमीन खऱेदी करणार : समाजकल्याण कार्यालय जमीनविक्रीस इच्छूकांनी प्रस्ताव देण्याचे आवाहन

अकोला, प्रतिनिधी- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी समाजकल्याण कार्यालयाकडून जिल्ह्यात शेतजमीन खरेदी करण्यात येणार असून, इच्छूक शेतमालकांनी प्रस्ताव देण्याचे आवाहन जिल्हा समाजकल्याण सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.
सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता ज्यांना आपल्या वैयक्तिक मालकीची शेतजमीन या योजनेअंतर्गत विक्री करावयाची आहे, अशा शेतमालकांनी जमीन विक्रीसंबंधी प्रस्ताव समाजकल्याण कार्यालयात सादर करावे. ई-क्लास, गावठाण जमीन, शासकीय जमिनीकरिता ही योजना लागु नाही.
शेतजमिनीवर कोणताही बोजा नसावा. याबाबत अद्ययावत 7/12 व आज रोजीच्या मुल्यांकनासह प्रथम कार्यालयात संपर्क साधावा व विहीत नमुन्यातील अर्ज कार्यालयातुन घेऊन जावा. त्यानंतर आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून जमिन विक्रीचा प्रस्ताव सादर करावा. जमिन विक्रीच्या दरास जिल्हास्तरीय समितीमार्फत मंजुरी देण्यात येईल व जमिनीचे दर निश्चित होतील, असे श्री. वाठ यांनी सांगितले.

०००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी-विक्रीवर पोलिसांना माहिती देणे अनिवार्य

विभागीय माहिती कार्यालयाच्या हिंद-दी-चादर निबंध व घोषवाक्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंद-दी-चादर’कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात -आमदार बाबुसिंगजी महाराज

नमुंमपा जिल्हा स्तरीय शालेय जलतरण स्पर्धेला आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते उत्साहात प्रारंभ राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त नामांकित जलतरणपटू श्री शुभम वनमाळी यांची विशेष उपस्थिती..

vishwatmaklokswamivarta

झाड हिरवळीसह आईच्या ममतेचे प्रतीक- केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी-प्रवेशिका पाठविण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta