vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

झाड हिरवळीसह आईच्या ममतेचे प्रतीक- केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण

झाड हिरवळीसह आईच्या ममतेचे प्रतीक- केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण

नवी दिल्ली, प्रतिनिधी: झाड केवळ हिरवळीचे प्रतीक नसून ते, आईच्या ममतेने प्रतीक असल्याची भावना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जागतिक पर्यावरण दिनी महाराष्ट्र सदन येथे वृक्षारोपण केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र सदन येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला उपस्थित होत्या.

वृक्षारोपणानंतर केंद्रिय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सहकार मंत्रालयाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत मंत्रालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाप्रती आपली कटिबद्धता दर्शवली. आज लावलेले हे झाड केवळ हिरवळीचे प्रतीक नाही, तर ते आईच्या ममतेचे प्रेरित आहे, जिने जीवन दिले, सांभाळले आणि प्रगतीची प्रेरणा दिली. प्रधानमंत्री यांच्या दूरदृष्टीने प्रेरित हे अभियान केवळ पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत नाही, तर आईबद्दलच्या श्रद्धेला निसर्गाशी जोडते.याच अभियानांतर्गत खासदार रवींद्र वायकर यांनीही महाराष्ट्र सदनात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण केले.

वृक्षारोपण कार्यक्रमात सहाय्यक निवासी आयुक्त डॉक्टर राजेश आडपावार, स्मिता शेलार, सारिका शेलार, महाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे पी गंगवार, किरण चौधरी, प्रियंका नागे यांच्यासह महाराष्ट्र सदनातील कर्मचारी उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध.

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी अशोक काकडे- एकूण 291 मतदान केंद्रांवर होणार मतदान, मतदारसंख्या अडीच लाखाहून अधिक 

vishwatmaklokswamivarta

सिपेटच्या विविध अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात..

vishwatmaklokswamivarta

परीक्षा केंद्र परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत

आपत्ती व्यवस्थापनासाठी कोंकण विभाग सज्ज“शून्य अपघात हे आपले ध्येय”आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस