vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी अशोक काकडे- एकूण 291 मतदान केंद्रांवर होणार मतदान, मतदारसंख्या अडीच लाखाहून अधिक 

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी अशोक काकडे- एकूण 291 मतदान केंद्रांवर होणार मतदान, मतदारसंख्या अडीच लाखाहून अधिक

 सांगली, प्रतिनिधी : नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस या 6 नगरपरिषदा तसेच शिराळा व आटपाडी या 2 नगरपंचायतींसाठी मंगळवार, दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून बुधवार, दि. 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान व मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व यंत्रणा तसेच पोलीस प्रशासनाची तयारी झाली असून मतदारानीही आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.

 सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या 6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींमध्ये एकूण 2 लाख 57 हजार 977 मतदार असून एकूण 291 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी मतदान केंद्रांवर एकूण 1 हजार 780, एफएसटी, एसएसटी, व्हीव्हीटी पथकांकरिता 371 तर आचारसंहिता, मीडिया कक्ष इतर अशा एकूण 785 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान व मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 नगरपरिषद व नगरपंचायतनिहाय एकूण मतदार व कंसात पुरूष, स्त्री व इतर मतदारसंख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे – उरूण-ईश्वरपूर नगरपरिषद – 64215 (31871, 32340, 4), विटा नगरपरिषद – 46332 (22923, 23402, 7), आष्टा नगरपरिषद – 30573 (15361, 15210, 2), तासगाव नगरपरिषद – 32994 (16750, 16243, 1), जत नगरपरिषद – 28090 (13983, 14105, 2), पलूस नगरपरिषद – 22067 (11143, 10920, 4), शिराळा नगरपंचायत – 13095 (6561, 6533, 1), आटपाडी नगरपंचायत 20611 (10369, 10240, 2).

 नगरपरिषद व नगरपंचायतनिहाय मतदान केंद्राची संख्या व कंसात मतदान केंद्रावर प्रत्यक्ष नेमणूक करण्यात आलेले मनुष्यबळ पुढीलप्रमाणे – उरूण-ईश्वरपूर नगरपरिषद – 67 (370), विटा नगरपरिषद – 49 (295), आष्टा नगरपरिषद – 37 (205), तासगाव नगरपरिषद – 36 (230), जत नगरपरिषद – 34 (200), पलूस नगरपरिषद – 26 (200), शिराळा नगरपंचायत – 17 (105), आटपाडी नगरपंचायत – 25 (175).

 नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीमध्ये थेट नगरराध्यक्ष प्रत्येकी एक याप्रमाणे 8 नगराध्यक्ष व एकूण 181 सदस्य निवडून द्यावयाचे असून नगरपरिषद व नगरपंचायतहिनाय निवडून द्यावयाची सदस्य संख्या व कंसात प्रभाग संख्या पुढीलप्रमाणे – उरूण-ईश्वरपूर नगरपरिषद – 30 (15), विटा नगरपरिषद – 26 (13), आष्टा नगरपरिषद – 24 (12), तासगाव नगरपरिषद – 24 (12), जत नगरपरिषद – 23 (11), पलूस नगरपरिषद – 20 (10), शिराळा नगरपंचायत – 17 (17) (प्रभाग क्र. 4 सह सदस्य संख्या), आटपाडी नगरपंचायत – 17 (17).

00000

संबंधित पोस्ट

कारागृहातील बंदीवानांसाठी ‘सहाय्यक योग प्रशिक्षक’ कौशल्य प्रशिक्षणास प्रारंभ

२६/११ हल्ल्यातील शहिदांना सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची श्रद्धांजली

महाराष्ट्र एसएससी परीक्षा 2025: मुख्य तारखा आणि तपशील हॉल तिकीट जाहीर…

vishwatmaklokswamivarta

नवीकरणीय ऊर्जाधारित शहरी प्रशासनातील उत्कृष्टता पुरस्कारा’ने नवी मुंबईचा राज्यस्तरीय गौरव

दैनिक ‘सनातन प्रभात’चा २६ वा वर्धापनदिन सोहळा मुंबईत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा !‘सनातन प्रभात’चे कार्य राष्ट्र उभारणीसाठी !– श्री. रवींद्र प्रभुदेसाई

रा. सू. गवई स्मारक उद्घाटनासाठी सज्ज*अमरावतीत उभे राहिले भव्य स्मारक*जिल्हाधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा

vishwatmaklokswamivarta