vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

श्रीगणेशोत्सवाच्या राज्य महोत्सवांतर्गत नवी मुंबईत 3 सप्टेंबरला भव्यतम ‘कलागणेश महोत्सव’

श्रीगणेशोत्सवाच्या राज्य महोत्सवांतर्गत नवी मुंबईत 3 सप्टेंबरला भव्यतम ‘कलागणेश महोत्सव’

नवी मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्र शासन निणर्यानुसार गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात यावा असे जाहीर करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नानाविध उपक्रम राबविण्यात येत आहेत व त्यामध्ये लोकसहभागावर विशेष भर देण्यात येत आहे.

 या दृष्टीने पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करावा असे नवी मुंबईकर नागरिकांना आवाहन करतांनाच पर्यावरण विषयक जाणीव जागृती करणारे देखावे उभारणा-या व पर्यावरणपूरक साहित्याचा सजावटीमध्ये वापर करणा-या गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन मिळावे व पर्यावरणाची जपणूक व्हावी याकरीता ‘पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेश दर्शन स्पर्धा 2025’ आयोजित करण्यात आली आहे.

 या सोबतच 64 कलांचा अधिपती मानल्या जाणा-या श्रीगणरायाचा उत्सव हा कला व संस्कृतीने संपन्न असावा यादृष्टीने बुधवार दि.03 सप्टेंबर 2025 रोजी, सायं. 4.00 वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृह या ठिकाणी ‘कलागणेश महोत्सव’ हा भव्यतम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 यामध्ये ‘सारेगमप संगीत स्पर्धा’ विजेते सुप्रसिध्द गायक श्री. प्रथमेश लघाटे आणि श्रीम. मुग्धा वैशंपायन यांचा श्रीगणेश भक्तीगीतांचा सुरेल वाद्यवृंद आयोजित केला आहे. त्यासोबतच स्थानिक विद्यार्थी, युवक व महिला यांच्या नृत्याविष्काराचाही समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे रंगमंचावर स्वराविष्कार सादर होताना श्रीगणेशाची प्रत्यक्ष मूर्ती साकारली जाणार आहे तसेच अक्षरांतून श्रीगणेशाची चित्राकृती रेखाटली जाणार आहे.

 तसेच या महोत्सवामध्ये ‘अक्षर गणेश’ हे कलाकृतीचे नाविन्यपूर्ण प्रदर्शन आणि इतर कलात्मक साहित्याचे स्टॉल लावले जाणार आहेत. श्रीगणरायाची विविध कलाविष्कारांमधून आराधना करणा-या या विशेष कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम व उपक्रमांच्या माध्यमातून नवी मुंबई क्षेत्रातील विविध क्षेत्रात कार्यरत संस्था, मान्यवर व्यक्ती, नागरिक यांच्याशी सुसंवाद वाढीवर भर देण्यात येत असून हा कार्यक्रम हा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.

 तरी दि. 03 सप्टेंबर 2025 रोजी विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी येथे सायं. 4.00 वाजता आयोजित ‘कलागणेश महोत्सव’ मध्ये प्रवेश विनामूल्य असून याची नोंद घेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्सवाचा आनंद वाढवावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

000000

संबंधित पोस्ट

बुलडाणा जिल्हयातील संग्रामपूर , जळगांव तालुक्याला अवकाळी वादळी पावसाचा फटका…केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले जिल्हा प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश..

भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; मोती तलावातील मूर्ती बसविण्यासह विविध मागण्यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

एनसीसी संचालनालय, महाराष्ट्रने शनिवार वाडा येथून पुणे-दिल्ली सायकल मोहीम ‘शौर्य के कदम, क्रांती की ओर’ ला हिरवा झेंडा दाखवून केले रवाना

vishwatmaklokswamivarta

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार -पालकमंत्री जयकुमार रावल

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील चित्रपटांची घोषणा इफ्फी 2025 मध्ये प्रतिष्ठित ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कारासाठी पंधरा चित्रपट स्पर्धेच्या रिंगणात

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त दोन दिवसांची मुंबईत बांबू परिषद..

vishwatmaklokswamivarta