vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रातील मालवाहतूक पूर्णपणे ठप्प,मुंबईतील अटल सेतू, नवी मुंबई मार्ग, पनवेल आणि इस्टर्न फ्री-वे हे मार्ग अवजड वाहनांकरिता बंद असल्याने कार्गो वाहतुकीवर मोठा परिणाम…

मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रातील मालवाहतूक पूर्णपणे ठप्प ,दक्षिण मुंबईतील अटल सेतू, नवी मुंबई मार्ग, पनवेल आणि इस्टर्न फ्री-वे हे मार्ग अवजड वाहनांकरिता बंद असल्याने कार्गो वाहतुकीवर मोठा परिणाम…

राज्य प्रतिनिधी-मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रातील मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दक्षिण मुंबईतील अटल सेतू, नवी मुंबई मार्ग, पनवेल आणि इस्टर्न फ्री-वे हे मार्ग अवजड वाहनांकरिता बंद असल्याने कार्गो वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे निर्यातदार, आयातदार आणि प्रोजेक्ट कार्गो चालकांना मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, जबल अली नाईनसाठी जाणारी महत्त्वाची अवजड मशिनरी वेळेत पोहोचू न शकल्यास दंड तसेच करार रद्द होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हीच स्थिती अनेक ट्रक आणि इतर वाहतुकीच्या साधनांची आहे. निर्यात आणि आयात माल, जो हजारो कोटी रुपयांचा आहे, तो सर्व अडकून पडला आहे. देशभरातील विविध प्रकल्पांसाठी लागणारी मालसामग्रीदेखील अडकल्याने महत्त्वपूर्ण योजना खोळंबल्या आहेत.

ट्रक रिकामे उभे आहेत, चालक नसल्यामुळे वाहनांची तपासणी घेतली जात आहे. त्यामुळे कंटेनरवर डिटेंशन चार्ज, डेमरेज, तसेच मोठ्या प्रमाणावर दंड लागत आहे. या परिस्थितीमुळे आर्थिक संकट आणि मानसिक तणाव वाढला आहे, असे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे माजी अध्यक्ष बल मलकीत सिंह यांनी सांगितले.

जर यावर लवकर उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्र व भारताच्या जागतिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो. मालवाहतुकीच्या खेपा रद्द होत असल्यामुळे आणि व्यापारी करार निष्फळ ठरत असल्यामुळे मोठ्या नुकसानाचा धोका आहे, असेही बल मलकीत सिंह यांनी स्पष्ट केले. आंदोलनाचा अधिकार स्वीकारला असला, तरी जीवनावश्यक मालवाहतूक, निर्यात-आयात माल वाहतुकीस अडथळा येणे समाजहिताचे नाही. त्यामुळे राज्य सरकारने मालवाहतुकीकरिता विशेष सुरक्षा तसेच आपत्कालीन मार्ग मोकळा करावा, अशी मागणी बल मलकीत सिंह यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट

मुक्तिसंग्राम मराठवाड्याचा जागर संविधानाचा’; बार्टीतर्फे आज कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबिर 

रब्बी हंगाम 2025 पिकस्पर्धा; अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी 31 डिसेंबर अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा द्यावा..

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक सांगीतिक मानवंदना

vishwatmaklokswamivarta

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले ‘रजत पदक’भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा-साईशा पवार

vishwatmaklokswamivarta