vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी-विक्रीवर पोलिसांना माहिती देणे अनिवार्य

जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी-विक्रीवर पोलिसांना माहिती देणे अनिवार्य

रायगड, प्रतिनिधी :जिल्ह्यात दहशतवादी कारवाया व गंभीर गुन्ह्यांमध्ये चोरीच्या वाहनांचा वाढता वापर लक्षात घेता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कडक आदेश जारी केला आहे. यापुढे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीत जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना वाहनांचा संपूर्ण तपशील स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवणे बंधनकारक असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे

पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू आहे. वाहन दुरुस्तीची दुकाने, लहान गॅरेज तसेच खासगी व्यापाऱ्यांकडून मोटारसायकली व इतर वाहने विक्रीस येत असतात. परंतु या व्यवहाराचा सविस्तर तपशील न ठेवला गेल्याने चोरीच्या वाहनांची देवाणघेवाण वाढत आहे. देशातील विविध दहशतवादी कारवायांमध्ये चोरीच्या मोटारसायकलींचा वापर झाल्याची उदाहरणे नोंदली गेली आहेत. गंभीर गुन्हे उघडकीस आणताना पोलिसांना वाहनांच्या मालकांचा व खरेदीदारांचा तपशील उपलब्ध नसल्याने तपासात अडचणी येतात.

जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी प्रत्येक सात दिवसांनी स्थानिक पोलीस ठाण्याला व्यवहाराचा तपशील द्यावा. या तपशिलात वाहन क्रमांक, इंजिन क्रमांक, चेसिस क्रमांक, मूळ मालकाचे नाव, कायमचा व सध्याचा पत्ता, मोबाईल क्रमांक, ओळखपत्र, आरसीटीसी बुक यांचा समावेश असणे बंधनकारक राहील. खरेदीदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक व ओळखपत्राची माहिती देणे देखील आवश्यक असेल.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ नुसार कठोर कारवाई करण्यात येईल. यात दंड तसेच इतर शिक्षेची तरतूद आहे

हा निर्णय सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने घेतला असून त्यामुळे जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करावे असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे.

००००

संबंधित पोस्ट

परदेश अभ्यास दौरा कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा –जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे

कापूस प्रकल्पामध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल प्रगतशिल शेतकरी कृष्णा कान्हेरे यांचा सपत्नीक गौरव करुन पुरस्कार..

vishwatmaklokswamivarta

आंबेडकरी चळवळीचे लोकशाहीर दिवंगत प्रभाकर पोखरीकर यांचे मुंबईत स्मारक उभारणार ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

भैय्यासाहेब देशमुख यांचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा- भैय्यासाहेबांसारखे अजातशत्रू व्यक्तिमत्व राजकारणात विरळा : हर्षवर्धन सपकाळ

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -‘डिजिटल महाराष्ट्र’च्या स्वप्नाला अमरावतीचे बळ; ई-गव्हर्नन्स मानांकनात अमरावती महानगरपालिकेचा राज्यात पाचवा क्रमांक!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनमहाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन