vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जात वैधता प्रमाणपत्रासाठी 26 जूनपासून विशेष मोहीम

जात वैधता प्रमाणपत्रासाठी 26 जूनपासून विशेष मोहीम

            सांगली, प्रतिनिधी) : राजर्षि शाहु महाराज जयंती पर्व दि. 26 जून 2025 ते 4 जुलै 2025 या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. वैधता प्रमाणपत्राअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली कार्यालयात त्वरित अर्ज करावा, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव मेघराज भाते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी (3 वर्षे/ 5 वर्षे विधी) व बी. एड. इत्‍यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग तसेच एसईबीसी (मराठा) या प्रवर्गातील आरक्षण अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेवेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम व नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यतः 3 ते 5 महिन्यांचा कालावधी समिती निर्णयाकरिता असतो, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाशिवरात्री*15 फेब्रुवारी -2026*यंदाची महाशिवरात्री: भक्तीकडून मुक्तीकडे…”*का करावी महाशिवरात्रीला विशेष पूजा?*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – रावसाहेब पाटील दानवे

जालन्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमींचे पोलिसांना निवेदन..

ज्वेल ऑफ नवी मुंबई, नेरूळ येथे भगवान गौतम बुध्द यांच्या ध्यानमग्न भव्यतम पुतळ्याचे दिमाखदार अनावरण

vishwatmaklokswamivarta

फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा 2025 चे विजेतेपद पटकावणाऱ्या दिव्या देशमुखचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

आदिवासींची समृद्ध संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपणे ही सर्वांची जबाबदारी–आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके*