vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक-मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात निर्बंध लागू

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक-मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात निर्बंध लागू

अहिल्यानगर, प्रतिनिधी:- राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये निर्बंध लागू करण्यात आले आहेत.याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार संबंधित परिसरात मंडपे व दुकाने उभारण्यास, अनधिकृत व्यक्तींना प्रवेश देण्यास तसेच मोबाईल, स्मार्टफोन, वायरलेस उपकरणे, ध्वनिक्षेपक आदी इलेक्ट्रॉनिक साधने बाळगण्यास मनाई आहे. तसेच खाजगी वाहने आणण्यास व राजकीय पक्षांच्या चिन्हांचे प्रदर्शन करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. मतदान केंद्राच्या परिसरात केवळ मतदार व निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनाच प्रवेश राहील.

सदर आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (२) अन्वये जारी करण्यात आला असून तो मतदान सुरू झाल्यापासून मतदान समाप्त होईपर्यंत लागू राहील.

0000

संबंधित पोस्ट

खिल्लारे परिवाराची वृद्धाश्रमाला भरीव मदत-फ्रिज, कुलर, कपाट, खुर्ची सह दिले भोजनदान…

आपत्ती व्यवस्थापनासाठी यांत्रिक बोटी उपयुक्त ठरतील – पालकमंत्री चंद्रकांत पाटील पलूस तालुक्यासाठीच्या ८ यांत्रिक बोटींचे औदुंबर येथे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

15 व्या वित्त आयोगातून 26 ग्रामपंचायतींना ई-रिक्षा घनकचरा व्यवस्थापनाला मिळणार नवी गती, पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी..

समाजाच्या शेवटच्या घटकाचे कल्याणकरण्याची राज्य शासनाची भूमिका- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे- मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात – 21 स्टॉलमधून शासनाच्या योजनांची माहिती प्रदर्शित विविध शासकीय योजनांचा 3 हजार 800 हून अधिक लाभार्थींना लाभ वाटप

आज बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाल्याची धक्कादायक बातमी…

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta