vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवस दारूबंदी जाहीर 

राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवस दारूबंदी जाहीर

अहिल्यानगर, प्रतिनिधी- राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २१ ते २३ एप्रिल या कालावधीत तसेच मतमोजणीच्या ४ मे रोजी संपूर्ण दिवस कोरडा दिवस लागू करण्यात आला असून संबंधित क्षेत्रात मद्यविक्रीस बंदी घालण्यात आली आहे, असा आदेश जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जारी केला आहे.

मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजे २१ एप्रिलपासून २३ एप्रिलपर्यंत व मतमोजणीच्या दिवशी ४ मे रोजी राहुरी विधानसभा मतदारसंघ व मतमोजणी केंद्र परिसरात कोरडा दिवस काटेकोरपणे अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीत सर्व अनुज्ञप्तीधारकांनी देशी व विदेशी मद्यविक्री पूर्णपणे बंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी) तसेच मुंबई दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम १४२ व संबंधित नियमांच्या आधारे हा आदेश लागू करण्यात आला आहे. संबंधित सर्व परवानाधारकांनी या कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

नमूना आय, सीएल-१, पीएलएल, बीआरएल या घटकांना उत्पादनास परवानगी असली तरी कोरडा दिवस कालावधीत कोणत्याही प्रकारची मद्यविक्री करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर कडक कारवाई करून त्यांची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

संबंधित पोस्ट

संपन्न औद्योगिक महाराष्ट्रासाठी ‘ इज ऑफ डूइंग बिजनेस’परवाने कमी करून नवीन उद्योगासाठी लागणारा वेळ कमी करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

कनिष्ठ सहाय्यक पदोन्नती प्रक्रिया २६ जिल्हा परिषदांमध्ये पूर्ण- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

कृषी विभागाची उपाययोजना;खतांच्या उपलब्धतेची माहिती मिळणार ‘ब्लॉग’वर

जालना येथे अनिवासी उद्योजकता- विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

अमृत पेठ-2026 उद्योजक मेळाव्याला 6 मार्चपासून सुरवात..

महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल : Rovision Tech Hub Pvt. Ltd. आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta