vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

कृषी विभागाची उपाययोजना;खतांच्या उपलब्धतेची माहिती मिळणार ‘ब्लॉग’वर

कृषी विभागाची उपाययोजना;खतांच्या उपलब्धतेची माहिती मिळणार ‘ब्लॉग’वर

छत्रपती संभाजीन- प्रतिनिधी-

शेतकरी बांधवांना खतांच्या उपलब्धतेची माहिती व्हावी यासाठी कृषी विभागामार्फत ब्लॉग तयार करण्यात आला आहे. तालुकानिहाय प्रत्येक कृषी केंद्रावर उपलब्ध खतांची माहिती या ब्लॉगवर उपलब्ध करण्यात आली आहे. आपल्या मोबाईलवरुन शेतकऱ्यांना ही माहिती सहजच पाहता येणार आहे.शेतकऱ्यांना विनामूल्य ही माहिती उपलब्ध होणार असल्याने खतांचा काळाबाजार, लिंकिंग सारख्या अपप्रवृत्तींना आळा बसेल व शेतकऱ्यांना लाभ होईल,असे विश्वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला.कृषी विभागाने तयार केलेल्या ब्लॉगची लिंक याप्रमाणे-https://adochhatrapatisambhajinagar.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding_24.htmlखतांच्या उपलब्धतेची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या कृषी विभागामार्फत ब्लॉग तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या ब्लॉगवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय कृषी सेवा केंद्र व त्या प्रत्येक कृषी सेवा केंद्रात उपलब्ध खताच्या प्रकारानुसार गोणी संख्या याची आकडेवारी दिसणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या खत वितरण माहिती ब्लॉगचे ऑनलाइन उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील आदी उपस्थित होत

जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या ‘अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरती’ या उपक्रमा अंतर्गत बहुतांश शेतकऱ्यांच्या तक्रारी खत उपलब्धते संदर्भात होत्या. या अनुषंगाने शेतकऱ्यांना खताची उपलब्धता व त्याची माहिती योग्य वेळी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्फत प्रयत्न केले गेले. यामध्ये ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना खताची उपलब्धता व्हावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी देखील या संदर्भात पाठपुरावा कृषी विभागाकडे केलेला होता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये असणाऱ्या कृषी सेवा केंद्र निहाय सर्व प्रकारच्या अनुदानित खताच्या उपलब्धतेचा तपशील गोणीच्या संख्येमध्ये नमूद केला आहे. हा ब्लॉग वापरण्यास सोपा असून शेतकरी बांधवांना अत्यंत सहजपणे वापरता येतो. ही माहिती केंद्र शासनाच्या आय एम एफ एस पोर्टलवरून घेण्यात आली असून यामध्ये दैनंदिन अद्यावतीकरण केले जाते.यासाठी जिल्हा परिषदचे मोहीम अधिकारी पंकज ताजने यांची नियुक्त करण्यात आली आहे.या ब्लॉगचा फायदा कृषी सेवा केंद्र संचालक आपल्या खताच्या माहितीचे अपडेट तसेच आय एफ एम एस प्रणाली वरील त्यांचा साठा व प्रत्यक्ष असलेला साठा याबाबत असलेली तफावत तात्काळ दूर करतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

०००००

संबंधित पोस्ट

27 जानेवारीला आयात-निर्यातीवर मोफत प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

रासायनिक खताबाबत तक्रार नोंदविण्याचे आवाहन

अमरावती मेस्को क्षेत्रीय कार्यालय येथेमाजी सैनिकांसाठी लिपिक पदांची भरती

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांना प्रति थेंब अधिक पिक योजना; 90 टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ

vishwatmaklokswamivarta

चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी-उपमुख्यमंत्री यांची केंद्र सरकारकडे पत्राद्वारे मागणी चीनमधून बेदाण्यांच्या बेकायदा आयातीमुळे देशातील शेतकरी, राष्ट्रीय महसुलाचे नुकसान- उपमुख्यमंत्री अजित पवार

10 नोव्हेंबरला शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

vishwatmaklokswamivarta