vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांना प्रति थेंब अधिक पिक योजना; 90 टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ

अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांना प्रति थेंब अधिक पिक योजना; 90 टक्केपर्यंत अनुदानाचा लाभ

बुलढाणा, प्रतिनिधी): राष्ट्रीय कृषि विकास योजना “प्रति थेंब अधिक पीक” योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचनासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळणार आहे. इच्छुक पात्र अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करुन योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी उपसंचालक ए.बी. गावडे यांनी केले आहे.

राष्ट्रीय कृषि विकास योजन प्रति थेंब अधिक पिक(सूक्ष्म सिंचन) योजनेंतर्गत निवड झालेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत आणि क्षेत्राबाहेरील) अंतर्गत पुरक अनुदानानुसार 90 टक्के अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.

शासन पत्र क्र. डीबीटी-0324/प्र.क्र.71/14 अ. दि. 10 जून 2024 नुसार, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील अल्प व अत्यल्प भुधारक लाभार्थ्यांना अनुक्रमे 25 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पुरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून देण्यात येणार आहे. उर्वरित 10 ते 15 टक्के अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना मधून अदा करण्यात येईल. यामुळे पात्र शेतकऱ्यांना मंजूर मापदंडानुसार एकूण 90 टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

बंद कालावधीत औषध पुरवठ्याकरिता अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज

सायबर जागरुकता कार्यशाळा संपन्नई-गव्हर्नन्स सेवांची सायबर सुरक्षितता  राखण्यासाठी नेहमी दक्षता बाळगावी-जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. सपकाळ

vishwatmaklokswamivarta

आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मातोश्रींचे निधन,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली कुटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट

इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवा-डॉ. नीलम गोऱ्हे

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेला भेट