vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेला भेट

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेला भेट

जालना, प्रतिनिधी :- जिल्ह्याच्या नवनिर्वाचित जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेला सदिच्छा भेट दिली. भेटी दरम्यान जालना जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक मंगेश केदार आणि प्रशिक्षण संस्थेचे संचालक गिरीश सुलताने यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. पुढे जिल्हाधिकारी यांनी ब्युटी पार्लर चे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींशी संवाद साधून संस्थेविषयी समाधान व्यक्त करत आवश्यक ते बदल करण्याविषयी सूचना केल्या. महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था ही ग्रामीण भागातील 18 ते 45 या वयोगटातील महिला आणि पुरुष यांच्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविते. या भेटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही योजना पोहोचावी हा जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीमागील उद्देश होता. सदरील प्रशिक्षण केंद्र सतकर कॉम्प्लेक्स अंबड चौफुली येथे चालते आणि येथे मसाला उद्योग, शिलाई काम, फॅशन डिजाईनींग, ब्युटी पार्लर, मेन्स सलून, हाऊस वायरिंग, मोबाईल रिपेरिंग, कुकूट पालन, शेळी पालन, मशरूम लागवड, कृषी उदयमी, मेणबत्ती बनवणे, दुग्ध व्यवसाय इत्यादी विषयांवर प्रशिक्षण दिले जाते तरी इच्छु नागरिकांनी संस्थेला भेट देऊन शासकीय प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा.

00000

संबंधित पोस्ट

पनवेल येथे सरदार@150 युनिटी मार्च आणि विकसित भारत पदयात्रेचे आयोजन नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

नवीन क्रिकेट मैदानासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला मदत करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वानखेडे मैदानावरील भव्य सोहळ्यात स्टँडला रोहित शर्मा यांचे नाव

vishwatmaklokswamivarta

आपले सरकार” पोर्टलच्या माध्यमातून देणात येणाऱ्या सेवाआता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोव्यात झालेल्या दूरसंचार विभागाच्या वार्षिक पश्चिम विभागीय परिषदेत उदयोन्मुख सुरक्षा विषयक समस्या आणि उपाययोजनांवर करण्यात आली चर्चा..

vishwatmaklokswamivarta

गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता, पीडितांबाबत संवेदनशीलता प्रभावी पोलीस व्यवस्थेचे सूत्र असावे – महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर राष्ट्रीय महिला आयोगाच्या ‘शक्ती व सुरक्षा’ कार्यक्रमांतर्गत सायबर गुन्ह्यांविरोधात पोलिसांची क्षमतावृद्धी कार्यशाळा

चौथे विश्व मराठी संमेलन मराठीचा शुद्ध, सक्षम आणि प्रभावी वापरासाठी माध्यमांचा नेहमीच पुढाकार -मराठी परिसंवादातील सूर