vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आपले सरकार” पोर्टलच्या माध्यमातून देणात येणाऱ्या सेवाआता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपले सरकार” पोर्टलच्या माध्यमातून देणात येणाऱ्या सेवाआता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, प्रतिनिधी:- राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना सेवा पुरवल्या जातात. या सेवांसाठी आपले सरकार हे पोर्टल असून या पोर्टलवरील सर्व सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुरवण्यात याव्यात. तसेच सर्व सेवा योग्यप्रकारे आणि गरजेनुसार पुरवण्याच्यादृष्टीने सर्व तालुक्यांमध्ये एक रिंग तयार करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

वर्षा निवासस्थानी सेवा सुलभीकरणासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज राज्यातील नागरिक सेवांसंदर्भात आढावा बैठक घेतली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकाच प्रकारच्या 9 सेवा एकत्र करण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सेवा पुरवठ्याच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत नियमितपणे पडताळणी करण्यात यावी, तसेच अर्ज प्रक्रियेत लागणारी कागदपत्रांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी नियोजन करावे. सर्व जिल्हा परिषद, महापालिका आणि विद्यापीठांचे डॅशबोर्ड एकसमान असावेत, जेणेकरून राज्यभरातील नागरिकांना एकसंध अनुभव मिळेल, या सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिंग व क्लस्टर प्रणाली राबवण्यात यावी. रिंगमध्ये सुरवातीस त्या तालुक्यातील १० ते १२ गावांचा समावेश असावा व गरजेनुसार सेवा पुरवण्यात याव्यात. या रिंगच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र गट व व्यवस्थापन टीम तयार करावी. तसेच सेवा पुरवण्यासाठी डिश डिजिटल सेवा हबचा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सेवा वितरणात अपीलची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि प्रमाणपत्र वितरणासाठी मल्टी-मॉडेल प्रणाली (जसे की ईमेल, पोर्टल, व्हॉट्सअ‍ॅप) वापरण्याच्या सूचना दिल्या.

आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून सध्या राज्यात 1001 सेवा पुरवण्याचे काम सुरू असून त्या पैकी ९९७ सर्व पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसामध्ये पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सेवांमध्ये २३६ सेवांची वाढ झाली आहे.

राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर आदी यावेळी उपस्थित होते.

०००

संबंधित पोस्ट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला (एनडीए) भेट

एकल महिलांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी विशेष अभियान राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत व पात्र एकल महिला लाभार्थींनाही घरकुल योजनेचा लाभ देण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

पोलीस पाटलांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे : पालकमंत्री जयकुमार रावल जिल्हास्तरीय पोलीस पाटील मेळावा संपन्न

vishwatmaklokswamivarta

वाशिम, भंडारा, अंबरनाथ आणि पालघर येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांना गती द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जालना शहरात भाजपच्या नवीन शाखेचे उदघाटन कार्यकर्त्यांना एकत्र आणणे हेच संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे – मा.आ.कैलासजी गोरंटयाल,भाजपच्या नव्या शाखेने शहरातील पक्ष कार्य बळकट होईल – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ भ्रष्टाचाराची तक्रार १०६४ टोल फ्री क्रमांकावर करा

vishwatmaklokswamivarta