vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा सभा,  बीडचे आमदार सुरेश धसांचा जाहीर सभेत इशारा काय म्हणाले ते पहा

 बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा सभा,  बीडचे आमदार सुरेश धसांचा जाहीर सभेत इशारा काय म्हणाले ते पहा

 

बीड प्रतिनिधी-

 बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून सर्वधर्मीयांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी या मोर्चाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील,बीडचे खासदार बजरंग सोनवणे,परभणीचे खासदार संजय जाधव,आमदार सुरेश धस,संदीप क्षीरसागर, राहुल पाटील यांच्यासह इतर स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, या मोर्चाची जोरदार तयारी सुरू असून हजारोच्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले. यावेळी आमदार सुरेश धस यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना मकोको लागला पाहिजे. एकदा आत गेला की 5-6 वर्षे पुन्हा माघारी येत नाही. आका तर आता गेलाच पाहिजे. आकाच्या आकाने काही गडबड केली असेल तर तोपण आत गेला पाहिजे. छत्रपती संभाजीराजेंना ज्याप्रमाणे हालहाल करुन मारले त्याप्रमाणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. मी दोघांची तुलना करत नाही पण तो फक्त दलित समाजाची बाजूला घ्यायला होता. हा व्हिडीओ आकाला दाखवला होता. पण तो आकाच्या आकालादेखील दाखवला असेल तर आकाने तुरुंगात जायची तयारी करा.

जे दोषी असतील त्यांना फाशी द्या, असे आकाचे आका म्हणतायत पण आधीच चांगलं वागायचं, असंही त्यांनी आधीच सांगायला हवं होतं, असे सुरेश धस म्हणाले. हत्या कोणी घडवून आणल्या? मास्टरमाइंड कोण? हे माहिती नसेल तर बारामतीची माणसं परभणीत पाठवा. 200-500 कुटूंब घर सोडून गेले. ते जीव मुठीत राहिले आहेत, असे सुरेश धस यांनी अजित पवार यांना उद्देशून म्हटले.

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची नुसती चौकशी करु नका, यांच्यावर मकोका लावा, असे बीडचे आमदार सुरेश धस म्हणाले आहेत.

संबंधित पोस्ट

रिमोट ऑपरेटिंग बोया ठरला देवदूत; काशीद समुद्रकिनारी बुडणाऱ्या दोन पर्यटकांना जीवदान*

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थींची मंगळवारी निवडजिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमास उपस्थितीचे

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.झाडे लावा झाडे जगवा… पर्यावरणाचा समतोल राखा…

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी-नाशिक येथे 10 दिवसांचे मोफत पूर्व प्रशिक्षण

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्रीवर निर्बंध; औषध प्रशासन विभागाची तपासणी मोहीम

vishwatmaklokswamivarta

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे उद्घाटन