vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.झाडे लावा झाडे जगवा… पर्यावरणाचा समतोल राखा…

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.झाडे लावा झाडे जगवा… पर्यावरणाचा समतोल राखा…

राज्य प्रतिनिधी-अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती येथील विद्या निकेतन शिक्षण संकुल येथे आमदार श्री. ज. मो. अभ्यंकर व स्थानिक आमदार श्री. गजानन लवटे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

हा संदेश महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने देत शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी लाडके मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. ज . मो. अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने वृक्षारोपण व ’प्रेरणा मास’ साजरा होत आहे. त्या निमित्ताने 27 जून ते 27 जुलै पर्यंत संपूर्ण राज्यात वृक्षारोपण केले जाणार आहे,

प्रेरणामास या वृक्षारोपण कार्यक्रमाचा भाग म्हणून आज दिनांक 27 जून 2025 शुक्रवार रोजी शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित प्रेरणा मास हा उपक्रम संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अध्यक्ष आमदार सन्मा ज. मो. अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली आज पासून सुरू झाला. त्याची सुरुवात अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती येथील विद्या निकेतन शिक्षण संकुल येथे आमदार श्री. ज. मो. अभ्यंकर व स्थानिक आमदार श्री. गजानन लवटे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख विकास येवले, युवा सेनेचे अक्षय गवळी व अन्य शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सुमारे 400 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. वृक्षारोपण सोहळा साजरा केला. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येकी एकेका झाडाची वर्षभराची संगोपनाची जबाबदारी घेतली. प्रत्येक दहा विद्यार्थ्यांच्या कार्याकडे लक्ष देण्याकरिता एकेका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली. वर्षभर या रोपांकडे लक्ष देण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा केली संकुलातील 10 एकर जागेत शेकडोच्या संख्येने वृक्षारोपण करण्यात आले.

उपस्थित शिक्षक विद्यार्थी व गावकरी यांना आमदार श्री. ज. मो. अभ्यंका यांनी पर्यावरणाचे महत्त्व विषयीचे मार्गदर्शन केले. वृक्षारोपण आपल्या जीवनात किती महत्त्वाचे आहे हे आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सांगितले.याप्रसंगी विद्यानिकेतन कॉलेजच्या प्राचार्या श्रीम अस्मिता अभ्यंकर, प्रा. संजय अभ्यंकर, प्रादेशिक सचिव व अकोला जिल्हा समन्वयक श्री मुकेश शिरसाट, शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष श्री रुपेश टाले, श्री राजाभाऊ राजणकर, श्री अनिल कोल्हे व इतर शिवसेना, शिक्षक सेना पदाधिकारी, शिक्षक विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती नितीन चौधरी

राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना

संबंधित पोस्ट

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना तीन महिन्यांची मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय न्याय दिन आणि जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती* *जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद*

शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करताना काळजी घ्यावी;जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

vishwatmaklokswamivarta

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या  दुरुस्तीची तातडीने आवश्यकता;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ४० उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई