vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पाटण तालुक्यातील मौजे हुंबरळी येथील कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई

पाटण तालुक्यातील मौजे हुंबरळी येथील कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी: सातारा जिल्ह्यातील भूस्खलन गावांचे पुणे येथील भूगर्भ शास्त्र विभागामार्फत सन 2023-204 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेक्षण अहवालाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार पाटण तालुक्यातील मौजे हुंबरळी येथील 236 कुटुंबांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. यानुसार या कुटुंबांना पुनर्वसनासाठी आजुबाजुच्या 2 ते 3 किलोमीटर परिसरात शासकीय, निमशासकीय जागा शोधावी. अशी जागा उपलब्ध नसल्यास प्रचलीत नियमानुसार या कुटुंबांच्या पसंतीनुसार खासगी वाटाघाटीने जागा खरेदी प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले,

सातारा येथील पालकमंत्री कार्यालयात हुंबरळी गावच्या पुनर्वसनाचा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संताष रोकडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, पाटण उपविभागाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव, कार्यकारी अभियंता राहूल अहिरे आदी उपस्थित होते.

    1.07 द.ल.मि.चा हुंबरळी पाझर तलाव असून यातील काही जमिन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात येते. त्यासाठी स्टेट बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा. मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल.

       वांग-मराठवाडी प्रकल्प बाधितांच्या जमिनी वाटपातील अडचणी व नागरी सुविधांबाबतही यावेळी त्यांनी निर्देश दिले. पर्यटन विभागामार्फत डिसेंबर ते जानेवारी महिन्यात कोयना महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. याचाही आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला.

0000

संबंधित पोस्ट

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचाजन्मदिवस सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत – रोहयो मंत्री भरत गोगावले

vishwatmaklokswamivarta

कर्जमुक्तीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मिळणार नवी ऊर्जा

स्टॉप डायरिया’ मोहीम प्रभावीपणे राबवा- अपर जिल्हाधिकारी अडकूणे

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात छत्रपति शिवाजी महाराजांच्या मोडितील पत्रांचे वाचन*

vishwatmaklokswamivarta

बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात- जिल्हाधिकारी अशोक काकडे- संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यात बालविवाह प्रकरणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

vishwatmaklokswamivarta