vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची अपघातग्रस्त युवकांच्या आरोग्याची विचारपूस, दिलासा आणि धीर

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची अपघातग्रस्त युवकांच्या आरोग्याची विचारपूस, दिलासा आणि धीर

गडचिरोली, प्रतिनिधी-गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या दोन युवकांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील किंग्सवे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन या दोन्ही रुग्णांची विचारपूस केली.

या भेटीदरम्यान सहपालकमंत्री जयस्वाल यांनी क्षितिज तुळशीदास मेश्राम व आदित्य धनंजय कोहपरे या दोन्ही अपघातग्रस्त युवकांशी थेट संवाद साधत त्यांना मानसिक धीर दिला. “तुमच्या प्रकृतीसाठी सर्वतोपरी वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतील. शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभं आहे,” असे त्यांनी सांगितले.

त्यांनी किंग्सवे हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशीही सविस्तर चर्चा करून रुग्णांच्या सध्याच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आणि त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती जाणून घेतली. रुग्णांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी रुग्णालय प्रशासनाला निर्देशही दिले.

अपघातानंतर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि शासन यंत्रणा रुग्णांच्या सेवेत तत्पर असून राज्य सरकारकडून या घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे तसेच जखमींच्या उपचाराचा पूर्ण खर्च शासन करणार आहे. अपघातातील पीडितांच्या पुनर्वसनासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही श्री जयस्वाल यांनी सांगितले

संबंधित पोस्ट

किल्ले रायगड येथे एनडीआरएफकडून रोप-वे रेस्क्यू मॉक ड्रिल संपन्न

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना महापोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याबाबत आवाहन..

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लिलावती रुग्णालयात अभिनेते सैफ अली खान यांची घेतली भेट*

vishwatmaklokswamivarta

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta

राज्यासह मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरूच..

vishwatmaklokswamivarta

श्री पोद्दारेश्वर राममंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पूजन…