vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील खरीप हंगामाची सुधारीत पैसेवारी जाहीर

जिल्ह्यातील खरीप हंगामाची सुधारीत पैसेवारी जाहीर

बुलढाणा, ( प्रतिनिधी: सन 2025-26 च्या खरीप हंगामातील बुलढाणा जिल्ह्यातील 1 हजार 420 गावाची सुधारीत पैसेवारी सरासरी 49 पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. यातील 1 हजार 122 गावांची खरीप हंगामाची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. तर 298 गावांची पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा जास्त आहे.

  50 पैसेपेक्षा कमी अंतिम पैसेवारी असलेले गावे : बुलढाणा तालुक्यात 98, चिखली येथे 144, देऊळगाव राजा येथे 64, मेहकर येथे 161, लोणार येथे 91, सिंदखेड राजा येथे 114, मलकापूर येथे 73, नांदुरा येथे 112, खामगाव येथे 146, जळगांव जामोद येथे 119 असे एकूण 1 हजार 122 गावांची पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा कमी आहे.

50 पैसेपेक्षा जास्त अंतिम पैसेवारी असलेले गावे: मोताळा येथे 120, शेगांव येथे 73 व संग्रामपूर येथे 105 असे एकूण 298 गावे गावांची पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा जास्त आहे.

00000

संबंधित पोस्ट

मराठा समाजाचे नेते श्री. मनोज जरांगे पाटील यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती!

वारणा धरणात 26.13 टी.एम.सी. पाणीसाठा

महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारी खाद्यजत्रा; बचतगटांच्या उद्योजकतेला नवे व्यासपीठ-पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तसेच भीमा व सीना नदीला सुरू असलेल्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर,सोलापूरच्या मदतीसाठी ५ यांत्रिक बोटी रवाना….

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीना 8 मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन