vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दुष्काळी परिस्थितीत राज्य शासन मराठवाड्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे    -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

दुष्काळी परिस्थितीत राज्य शासन मराठवाड्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे    -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

        ठाणे, प्रतिनिधी: राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शासनाने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थती जाहिर केली आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये राज्य शासन मराठवाड्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव प्रताप सरनाईक यांनी आज मराठवाडा जनविकास परिषद, ठाणे यांच्या वतीने गडकरी रंगायतन येथे ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सोहळा’ तथा ‘मराठवाडा मित्र आणि मराठवाडा रत्न पुरस्कार वितरण सोहळयात केले.

            यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, पद्मश्री श्रीरंग लाड, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (SRA) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मराठवाडा जन विकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, ‘लोकमत’चे संपादक अतुल कुलकर्णी, डॉ.मुकुंद अडसूळ, डॉ.मंगेश कराड, जेष्ठ पत्रकार दिलीप सपाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

            याप्रसंगी ‘मराठवाडा मित्र पुरस्काराने’ सन्मानित झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, आपण आतापर्यंत प्रामुख्याने धाराशिव जिल्ह्यामध्ये विकास व सेवाकार्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, या पुरस्कारामुळे संपूर्ण मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीतही धाराशिवच्याच धर्तीवर प्रभावी काम करण्याची आपली जबाबदारी आता आणखी वाढली असून, ती आपण पूर्ण निष्ठेने पार पाडू. सध्या मराठवाड्यात आणि विशेषतः धाराशिव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची तीव्र समस्या निर्माण झाली असून पाणीसाठा केवळ 8 टक्क्यांवर आला आहे. दुष्काळग्रस्त भागामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, चारा छावण्यांची उभारणी आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

               यावेळी मराठवाडा जन विकास परिषद ठाणे यांच्या वतीने राज्यातील दृष्काळग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. हा धनादेश कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.     ठाण्यात मराठवाड्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हक्काचे वसतिगृह उभारण्याच्या मुद्यावर बोलताना, यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, प्रामुख्याने घोडबंदर भागात योग्य तो भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन नेत्यांनी दिले.

    यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर व पुरस्कार प्राप्त मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते पद्मश्री श्रीरंग लाड, लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (SRA) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, डॉ.मंगेश कराड, डॉ.मुकुंद अडसूळ यांना मराठवाडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठवाडा जन विकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘मराठवाडा बहुजन बुलेटिन’ या विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

00000

 

संबंधित पोस्ट

आषाढी एकादशी निमित्त राज्यपालांची श्री शृंगेरी शंकर मठाला भेटपंढरपूरची वारी जगातील अद्भुत परंपरा असल्याचे राज्यपालांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय: जालना येथे विशेष प्रशिक्षण शिबिर संपन्न! 🤝🚔

अग्रवाल युवा मंचची नुतन कार्यकारिणी जाहीर…

vishwatmaklokswamivarta

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर-गडचिरोलीतील आदिवासींच्या हक्कांचा प्रश्न सभागृहात मांडला

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५५,२८६ लाभार्थ्यांचे घरकूल मंजूर २८,७७६ लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता जमा-केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा यांच्या हस्ते ॲानलाईन वितरित- पुण्यात गृहोत्सव कार्यक्रम संपन्न ; बुलढाण्यातून झेडपी सीईओ, सरपंच, लाभार्थी सहभागी

vishwatmaklokswamivarta