vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५५,२८६ लाभार्थ्यांचे घरकूल मंजूर २८,७७६ लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता जमा-केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा यांच्या हस्ते ॲानलाईन वितरित- पुण्यात गृहोत्सव कार्यक्रम संपन्न ; बुलढाण्यातून झेडपी सीईओ, सरपंच, लाभार्थी सहभागी

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५५,२८६ लाभार्थ्यांचे घरकूल मंजूर २८,७७६ लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता जमा-केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा यांच्या हस्ते ॲानलाईन वितरित- पुण्यात गृहोत्सव कार्यक्रम संपन्न ; बुलढाण्यातून झेडपी सीईओ, सरपंच, लाभार्थी सहभागी

 

बुलढाणा, प्रतिनिधी: प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यातील ५५,२८६ लाभार्थ्यांना घरकूल मंजुरीचे पत्र वाटप आणि त्यापैकी २८,७७६ लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा यांच्या हस्ते ॲानलाईन वितरित करण्यात आला.

केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती संकुल येथे राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना घरकूल मंजुरी पत्र वाटप आणि १० लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा ‘गृहोत्सव’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.

तर जिल्ह्यातून मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपायुक्त श्री कवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम मोहन, प्रकल्प संचालक राजेश इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य आशिष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत संजय इंगळे यांच्यासह अधिकारी, तसेच पंचायत समिती स्तरावरून स्थानिक आमदार, गटविकास अधिकारी, तसेच सर्व ग्रामपंचायत स्तरावरुन सरपंच, लाभार्थी, नागरिक ॲानलाईनरित्या सहभागी झाले होते. यावेळी या थेट प्रक्षेपण कार्यक्रमात सहभागी झालेल्या घरकूल लाभार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. ०००

संबंधित पोस्ट

घाणेवाडी तलावाच्या पूर्णतः क्षतीग्रस्त सांडव्याची तातडीने दुरुस्ती करावी- संजय लाखेपाटील यांनी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे केली मागणी

जालना शहर महानगरपालिका व पतंजली योग शिबीर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्राणायाम शिबीरास प्रारंभ०७ फेब्रुवारी पर्यंत राहणार शिबीराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे आठ दिवसात पंचनामे करा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अतिवृष्टीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत दिले निर्देश – महसूल, ग्रामविकास, कृषि विभागाने बांधावर जावून संयुक्त पंचनामे करावेत- नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी जमा होण्यासाठी कार्यवाही करावी- गृहोपयोगी साहित्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत करणार

टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये ज्येष्ठांनी मारली बाजी करमणुकीमुळे ज्येष्ठांचा उत्साह सिंगेला..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका चे ५० टक्क्यांची सवलत देणाऱ्या अभय योजनेचा लाभ घेण्याची शेवटची संधी 💯✨

शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे* जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने जनजागृती * जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले उद्घाटन

vishwatmaklokswamivarta