vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपा जालना शहराच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन, वृक्षारोपण व जिल्हा कार्यकर्ता संमेलनाचे आयोजनमोठ्या संख्येने उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

भाजपा जालना शहराच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन, वृक्षारोपण व जिल्हा कार्यकर्ता संमेलनाचे आयोजनमोठ्या संख्येने उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना (प्रतिनिधी) : भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ तथा अखंड भारताचे पुरस्कर्ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, जालना शहराच्या वतीने सोमवार, दि. ०६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान (फुलंब्रीकर नाट्यगृह जवळ), जालना येथे प्रतिमा पूजन, वृक्षारोपण तसेच जिल्हा कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमामध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आगामी संघटनात्मक उपक्रम, विविध कार्यक्रमांचे नियोजन आणि कार्यकर्त्यांशी संवाद या अनुषंगाने जिल्हा कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन भाजपा जालना महानगरचे जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

भिम पदयात्रेद्वारे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

रब्बी हंगाम 2025 पिकस्पर्धा; अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी 31 डिसेंबर अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आमदार विक्रम काळे यांना ‘मराठवाडा आयकॉन’ पुरस्कार

शेगाव येथील टावरी परिवाराकडून मरणोत्तर नेत्रदान…

vishwatmaklokswamivarta

निर्यातक्षम आंबा बागांची मँगोनेट प्रणालीद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पहलगाम घटना; राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात-दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती