vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नायगाव बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत सिरसाठ दाम्पत्याकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप**’पे बॅक टू सोसायटी’ भावनेतून सामाजिक बांधिलकी; विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

*नायगाव बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत सिरसाठ दाम्पत्याकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप**’पे बॅक टू सोसायटी’ भावनेतून सामाजिक बांधिलकी; विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

राज्य प्रतिनिधी-*देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे…”* या विंदा करंदीकरांच्या काव्यपंक्तींचा प्रत्यय नुकताच येथील जिल्हा परिषद शाळेत पाहायला मिळाला. नव्या शैक्षणिक सत्राचे औचित्य साधून नायगाव बुद्रुक गावचे तलाठी श्री. जय सिरसाठ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी सामाजिक बांधीलकी जपून, शाळेतील गोरगरीब, शेतकरी व कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. त्यांच्या या उपक्रमामुळे परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.**वाढदिवस किंवा स्मृतिदिनाचा गाजावाजा नाही, केवळ समाजसेवा!**कोणताही कौटुंबिक वाढदिवस, स्मृतिदिन किंवा विशिष्ट निमित्त नसताना केवळ ‘पे बॅक टू सोसायटी’ (समाजाचे देणे) या भावनेतून सिरसाठ दाम्पत्याने या उपक्रमाचे आयोजन केले होते. येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी उपयुक्त ठरणारी पुस्तके, वह्या, रजिस्टर आणि कंपास बॉक्स यांसारख्या उच्च दर्जाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.

**स्वतःच्या संघर्षाच्या जाणिवेतून मिळाली प्रेरणा**याप्रसंगी बोलताना तलाठी जय सिरसाठ साहेब भावुक झाले. त्यांनी आपल्या बालपणातील आठवणींना उजाळा देत सांगितले की, *”मी स्वतः अत्यंत हालाखीत आणि शैक्षणिक साहित्याचा अभाव असताना शिक्षणाचा खडतर प्रवास पूर्ण केला आहे. आजच्या ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतमजुरांच्या मुलांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागू नये, याच निर्मळ भावनेतून आम्ही या उपक्रमाचे नियोजन केले.”* त्यांच्या या मनोगताने उपस्थित पालकांचे डोळे पाणावले.

**मान्यवरांची उपस्थिती**हा उपक्रम मंगरूळ नवघरे केंद्राचे नवनियुक्त केंद्रप्रमुख श्री. निलेश जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. पंजाबराव गवई तसेच गावचे सरपंच श्री. विष्णूभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. उपस्थित सर्व मान्यवरांनी सिरसाठ दाम्पत्याच्या या दातृत्वाचा गौरव केला व शासकीय सेवेत कार्यरत असताना असा आदर्श समाजासमोर ठेवल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन शाळेतील शिक्षक वृंद व ग्रामस्थांनी केले. अखेर, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, नायगाव बुद्रुकच्या वतीने सिरसाठ दाम्पत्याचे मनापासून आभार मानण्यात आले.

 0000

संबंधित पोस्ट

चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘डिजिटल स्मार्ट रीडिंग झोन’चा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

ध्वजदिन निधीसाठी रुपये 5 लाख मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे सूपूर्द

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला-विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमी पाऊस पडलेल्या भागांमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

जिल्ह्यातील अनेकांनी भिकन रोजेकर यांचा आदर्श घ्यावा: आमदार नारायण कुचे

सातारा जिल्ह्यातील उद्योग व व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल सहकार्य करेल-पोलीस अधीक्षक तुषार दोशी

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी प्रवेश अर्ज 26 ऑक्टोबरपर्यंत करण्याची मुदत..

vishwatmaklokswamivarta