vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार-2025’ प्रदान-महाराष्ट्रातील प्रतिभांचा विज्ञान भवनात सन्मान

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार-2025’ प्रदान-महाराष्ट्रातील प्रतिभांचा विज्ञान भवनात सन्मान

नवी दिल्ली प्रतिनिधी : महाराष्ट्रातील दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्थां आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे दिव्यांग व्यक्ती यांना आज राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार-2025’ प्रदान करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित या सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि दिव्यांगजन सशक्तिकरण विभागाच्या सचिव श्रीमती बी. विद्यावती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय सन्मानाने महाराष्ट्रातील कर्तृत्वाचा गौरव,महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती आणि संस्थांनी विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय स्तरावर हा सन्मान प्राप्त केला आहे. नागपूरच्या सुश्री अबोली विजय जितना यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती जितना या नागपूरच्या पहिल्या व्हीलचेअर मॉडेल आणि प्रेरक वक्ता म्हणून ओळखल्या जातात. तर, पुण्यातील श्रीमती भाग्यश्री मनोहर नादी मित्तला कन्ना यांनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या श्रवण बाधित असूनही कला आणि व्यावसायिक कौशल्य शिक्षिका म्हणून 500 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच, कुमारी धृती रांका (पुणे) हिला श्रेष्ठ दिव्यांग बाल-बालिका श्रेणीत सन्मान मिळाला. धृती ‘टिकलर आर्ट’ची संस्थापक असून न्यूरो-डायव्हर्स कलाकारांच्या आजीविकेला प्रोत्साहन देते आणि तिने शार्क टँक इंडियासह अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व केले आहेयाव्यतिरिक्त प्रसिद्ध ऑडिओलॉजिस्ट आणि समाजसेविका सुश्री देवांगी पराग दलाल (विलेपार्ले, मुंबई) यांचा समावेश आहे. त्यांनी जोश फाउंडेशनच्या माध्यमातून 2000 हून अधिक मुलांना मोफत श्रवण यंत्रे आणि थेरपी प्रदान केली आहे. संस्था श्रेणीत जय वकील फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर (मुंबई) या संस्थेला बौद्धिक आणि विकासात्मक दिव्यांगता असलेल्या व्यक्तींच्या सशक्तिकरणासाठी सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून गौरविण्यात आले. तसेच, डिजिटल सुगमता (Accessibility) क्षेत्रात महत्त्वाचे कार्य करणाऱ्या बॅरियर ब्रेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (मुंबई) ला सर्वोत्कृष्ट सुगम्य माहिती तंत्रज्ञान श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे

संबंधित पोस्ट

बेस्ट कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश बेस्ट सक्षमीकरण आणि कर्मचारी मागण्यांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय,बेस्ट कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून ३००० रुपये आणि वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना २००० रुपये मासिक हंगामी वाढ संप मागे घेत असल्याचे कृती समितीने केले जाहीर..

कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत पाणी उपसा बंदी

सुदर्शन आठवले यांना २०२४ चा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार जाहीर

शहापुरात २७ जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’विविध दाखले अन् महसुली सेवा एकाच छताखाली मिळणार

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे होणार उद‌्घाटन- मंत्री मंगलप्रभात लोढा राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे ५, १३ आणि २३ वर्षे मुदतीचे अनुक्रमे ८०० कोटी, १६०० कोटी व १२०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस