vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शहापुरात २७ जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’विविध दाखले अन् महसुली सेवा एकाच छताखाली मिळणार

शहापुरात २७ जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’विविध दाखले अन् महसुली सेवा एकाच छताखाली मिळणार

ठाणे प्रतिनिधी:- सर्वसामान्य नागरिकांचे महसूल विभागाशी संबंधित असणारे प्रश्न तात्काळ सुटावेत आणि शासकीय दाखले तसेच विविध कल्याणकारी योजनांचे लाभ एकाच ठिकाणी सहजासहजी उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका व मंडळ क्षेत्रातील नागरिकांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर २०२६’ चे विशेष आयोजन करण्यात आले आहे. हे भव्य शिबिर सोमवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत शेटे मॅरेज हॉल, चेरपोली (ता. शहापूर, जि. ठाणे) येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल व वन विभाग, तहसीलदार कार्यालय शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष जनकल्याणकारी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या समाधान शिबिरामध्ये स्थानिक नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना अनेक महत्त्वाच्या महसुली सेवा आणि शासकीय योजनांचा थेट लाभ एकाच छताखाली मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्पन्नाचे दाखले, रहिवास व अधिवास (डोमासाइल) प्रमाणपत्रे, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र आणि जातीचे दाखले यांचे त्वरित वाटप केले जाणार आहे. याशिवाय जमिनीशी संबंधित अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रे जसे की ७/१२ व ८-अ उतारा वाटप करणे तसेच प्रलंबित फेरफार तात्काळ निकाली काढण्याची कार्यवाही केली जाईल. जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील नावांतील किरकोळ दुरुस्ती कलम १५५ अंतर्गत या शिबिरातच करून दिली जाणार आहे.

 

शेतकरी बांधवांसाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे आणि ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी (Farmer ID) तयार करण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना आणि विविध सामाजिक योजनांचा लाभही नागरिकांना येथे घेता येणार आहे. जमीन मोजणीसाठी ई-मोजणी अर्ज स्वीकारणे आणि बिनशेती (N.A.) परवानगीबाबत मोफत मार्गदर्शन अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे थेट दिले जाणार आहे. या शिबिराचे आयोजन ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप आणि शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच १३५-शहापूर (अ.ज.) विधानसभेचे आमदार दौलत भिका दरोडा यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात येत आहे. तरी शहापूर तालुक्यातील व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि शेतकरी बांधवानी या महाराजस्व समाधान शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त महसूल कुटुंब व तहसीलदार कार्यालय शहापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती व संपर्कासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय भिवंडी (संपर्क: ९८३३९२६५०९) येथे संपर्क साधता येईल.

 

000000000000

संबंधित पोस्ट

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ.एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्काराकरिता अर्ज करावेत…

राजकीय पक्षांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध राखण्याचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती यांनी केले आवाहन

बुलढाणा जिल्हा कारागृहात ‘जिवन गाणे गातच जावे’ सांस्कृतिक कार्यक्रम; बंद्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत पाणी उपसा बंदी

आंबेनळी घाट अपघात: मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करा;पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सातारा व रायगड जिल्हा प्रशासनाला निर्देश

हिंद दि चादर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून चार बस रवाना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दाखवला हिरवा झेंडा- शनिवारी 3 बस होणार रवाना- जिल्ह्यातील 296 नागरिक होणार सहभागी