vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ.एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्काराकरिता अर्ज करावेत…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ.एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्काराकरिता अर्ज करावेत…

ठाणे, प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार’ तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने ‘डॉ.एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार’ देण्यात येतात.

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रु.1 लाख, रु.75 हजार, रु.50 हजार, रु.25 हजार इ. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.

राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रु.50 हजार तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रु.25 हजार इ. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.

सन 2024-25 या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक (ग्रंथमित्र) यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दि.30 सप्टेंबर 2025 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

00000

 

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनाजिल्ह्याचा कृती आराखडा सर्वसमावेशक करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षणउच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण..

मुंबई (पूर्व) आरटीओत MH03FB नवीन नोंदणी मालिका सुरू

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिद्धीकरिता**ग्रीन मॅरेथॉनव्दारे नेरूळ विभागात पर्यावरण संवर्धन संदेशाचे प्रसारण

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य-: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी..

vishwatmaklokswamivarta