vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

मुंबई (पूर्व) आरटीओत MH03FB नवीन नोंदणी मालिका सुरू

मुंबई (पूर्व) आरटीओत MH03FB नवीन नोंदणी मालिका सुरू…

मुंबई, प्रतिनिधी -मुंबई (पूर्व) प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहन संवर्गातील चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन MH03FB ही मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सध्या वापरात असलेली MH03ES मालिका संपत आल्याने ही नवीन मालिका २२ डिसेंबर २०२५ पासून लागू होणार आहे.

या नव्या मालिकेतून आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करू इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा. अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅन कार्ड तसेच पसंतीच्या क्रमांकासाठीची विहित फी राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह Regional Transport Office, Mumbai (East) किंवा RTO, Mumbai (East) यांच्या नावे काढून २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास, महाराष्ट्र शासनाच्या ३० ऑगस्ट २०२४ च्या अधिसूचनेनुसार नियमीत फी व्यतिरिक्त सर्वांत जास्त रक्कमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास तो नोंदणी क्रमांक देण्यात येणार आहे.

आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्याची सविस्तर कार्यपद्धती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली असून, अनधिकृत व्यक्तीकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी वाहनधारकांनी स्वतःच आरटीओ कार्यालयात अर्ज करण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पल्लवी कोठावदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व), २ रा व ३ रा मजला, बी-२ इमारत, वडाळा ट्रक टर्मिनल, वडाळा, मुंबई ४०० ०३७ (इमेल : rto.03-mh@gov.in; दूरध्वनी क्र. ०२२-२४०३६२२१) येथे संपर्क साधावा.

000

संबंधित पोस्ट

कल्याण मध्ये जमिनीच्या वादातून गोळीबार, एकाचा मृत्यू ,जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय…

vishwatmaklokswamivarta

लोकायुक्त संस्थेच्या चार सदस्यांचा शपथविधी संपन्न· राज्यपालांकडून न्यायिक व बिगर न्यायिक सदस्यांना शपथ…

बाल कामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान; विविध कार्यक्रमाचे आयोजन

वारणा धरणात 28.23 टी.एम.सी. पाणीसाठा

राहुरी पोटनिवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान प्रणालींचे प्रशिक्षण

बुलढाणा जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला; कमाल तापमानाचा पारा ४३.६ अंशांवरविदर्भात अमरावती आणि वर्धा सर्वाधिक उष्ण; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन