vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राहुरी पोटनिवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान प्रणालींचे प्रशिक्षण

राहुरी पोटनिवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान प्रणालींचे प्रशिक्षण

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी :- २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२६ च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या विविध माहिती तंत्रज्ञान प्रणालींच्या वापराबाबत सर्वसमावेशक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. हे प्रशिक्षण राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पवन टेंभुर्णे तसेच ‘जिल्हा माहिती तंत्रज्ञान कक्षाच्या’ (डीआयटी) पथकाकडून देण्यात आले. तंत्रज्ञानाचा प्रभावी व अचूक वापर करून आगामी पोटनिवडणूक पारदर्शक व निर्दोषपणे पार पाडण्याच्या उद्देशाने या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षण सत्रामध्ये निवडणूक आयोगाच्या अत्यंत महत्त्वाच्या संगणकीय प्रणालींच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नागरिकांना थेट व जलद गतीने नोंदवता याव्यात, यासाठी विकसित केलेल्या ‘सी-व्हिजिल’ या भ्रमणध्वनी प्रणालीची (ॲपची) माहिती देण्यात आली. तसेच, निवडणूक प्रक्रियेतील अधिकृत संदेशवहन व्यवस्थापनासाठीची ‘ई-एसएमएस’ प्रणाली आणि उमेदवारांची माहिती व निवडणूक निकाल व्यवस्थापनासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ‘एन्कोअर’ प्रणालीच्या सर्व भागांचे सखोल प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.

याव्यतिरिक्त, संरक्षण दलातील व इतर पात्र मतदारांसाठी असलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वितरित टपाल मतदान व्यवस्थापन प्रणाली’ (ईटीपीबीएमएस) आणि प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील कामकाजासाठी मतदान केंद्राध्यक्षांकरिता तयार करण्यात आलेल्या विशेष संगणकीय प्रणालीच्या (पीआरओ ॲप्लिकेशन) वापराबाबतही अधिकाऱ्यांना अवगत करण्यात आले. या सर्व अद्ययावत तंत्रज्ञान प्रणालींच्या अचूक वापरामुळे आगामी निवडणूक प्रक्रियेत अधिक गतिमानता, सुलभता व पारदर्शकता येईल, असा विश्वास या प्रशिक्षणादरम्यान व्यक्त करण्यात आला

0000

संबंधित पोस्ट

कृष‍ि विभागाची धडक कारवाई-अनधिकृतपणे बेकायदेशीररित्या विनापरवाना व विना ई-पॉस द्वारे भेसळयुक्त रासायनिक खत व‍िक्री प्रकरणी गुन्हा दाखल 

महाराष्ट्र राज्यात नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात अन्न भेसळ संदर्भात कार्यशाळा; प्रात्यक्षिकाव्दारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन

खामगावात लवकरच ओपन जीम आणि जॉगिंग पार्कची निर्मिती:राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांचा पुढाकार..

घनकचरा व्यवस्थापन नियम 2026’ चे पालन करून एकत्रित प्रयत्नांतून नवी मुंबईचे ‘देशातील सुपर स्वच्छ शहर मानांकन’ कायम राखण्याचा निर्धार

vishwatmaklokswamivarta

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण तिस-या दिवशीही मोहीम…

vishwatmaklokswamivarta