vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हिंद दि चादर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून चार बस रवाना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दाखवला हिरवा झेंडा- शनिवारी 3 बस होणार रवाना- जिल्ह्यातील 296 नागरिक होणार सहभागी

हिंद दि चादर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून चार बस रवाना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दाखवला हिरवा झेंडा- शनिवारी 3 बस होणार रवाना- जिल्ह्यातील 296 नागरिक होणार सहभागी

सांगली, प्रतिनिधी: श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च 2026 या कालावधीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सांगली जिल्ह्यातील नागरिकांना घेऊन आज चार बस रवाना झाल्या. पैकी शीख संत आश्रम गुरूद्वारा, टिंबर एरिया, सांगली येथून नागरिकांना घेऊन जाणाऱ्या दोन बसना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी हिरवा झेंडा दाखवला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, सांगली अपर तहसिलदार अश्विनी वरूटे, अन्य अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना घेऊन झुलेलाल मंदिर शामरावनगर सांगली येथून एक आणि उमदी (ता. जत) येथून एक बस रवाना झाली. या चारही बसमधून एकूण 173 नागरिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आज रवाना झाले.

28 फेब्रुवारीला सकाळी 3 बस रवाना होणार आहेत. त्यामध्ये सांगली बसस्थानक येथून दोन बस आणि पलूस बसस्थानक येथून एक बस रवाना होणार आहे. या बसमधून जाणारे 123 नागरिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सात बसद्वारे सांगली जिल्ह्यातून एकूण 296 नागरिक सहभागी होणार आहेत. या सर्वांना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शुभेच्छा दिल्या.

00000

संबंधित पोस्ट

विकासकामांना पूर्ण वेगाने पूढे न्या – मुख्य सचिव सुजाता सौनिक-दोन आठवड्याच्यावर विकासकामे प्रलंबित ठेवू नये शासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा…

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांची प्रत्यक्ष पाहणी करीत मौलिक सूचना…

vishwatmaklokswamivarta

नवीन रास्त भाव दुकानांसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी पुरवठा विभागाचे आवाहन*

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन संस्थेवर बंदी घालण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयातून निकाली**सनातन संस्थेचे निर्दोषत्व पुन्हा सिद्ध; ‘हिंदु दहशतवादा’च्या षड्यंत्राचा पर्दाफाश*

vishwatmaklokswamivarta

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजीचा भ्याड दहशतवादी हल्ला जीवाची बाजी लावत परतवून लावताना मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी शहीद झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वीरमरण आलेल्या शहिदांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

vishwatmaklokswamivarta