vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळlथेट कर्ज योजना १६० जणांचे अर्ज पात्र; दि.६ मार्च रोजी सोडत

 

छत्रपती संभाजीनगर, – प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत थेट कर्ज योजेनअंतर्गत एक लाख रुपये कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. त्याअंतर्गत दिलेल्या मुदतीत ३११ कर्ज मागणी अर्ज स्विकारण्यात आले.त्यातील १६० अर्ज छाननी अंतर्गत पात्र झाले आहेत. तर १५१ कर्ज मागणी अर्ज अपात्र आहेत, असे जिल्हा व्यवस्थापक प्रणिता बोराडे यांनी कळविले आहे. पात्र अर्जांपैकी प्रत्यक्ष लाभार्थी निवडीसाठी दि.६ माच रोजी सोडत पद्धतीने निवड केली जाणार आहे.

१६० पात्र कर्ज मागणी अर्जापैकी पुरुष ६५ व महिला ९५ अर्ज आहेत. या योजनेचे जिल्हा कार्यालयास ५० प्रकरणांचे उद्दिष्ट असून अध्यक्ष लाभार्थी निवड समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या मान्येतेनुसार चिठ्याव्दारे (लॉटरी पद्धतीने) निवड करावयाची आहे. त्या करीता शुक्वर दि. ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृह खोकडपुरा, शिवाजी हायस्कुलच्या शेजारी छत्रपती संभाजीनगर येथे लाभार्थी निवड समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थीची निवड चिठ्ठ्याव्दारे (लॉटरी पद्धतीने) होणार आहे. तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अर्जदारांनी या सोडत बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती. प्रणिता रा. बोराडे (सरपते) यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे,दुर्घटनाग्रस्त विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी समोर आलेली आहे.

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात पुढील ३ दिवस हलका पाऊस व मेघगर्जनेसह सरींचा अंदाज

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जुलैमध्ये मिळणार;शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

सांगवी येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

पॅलेस्टाईन समर्थकांच्या मोर्चाला अनुमती नाकारली;हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश !दहशतवादाचे समर्थन करणारे असे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडा !- हिंदु राष्ट्र समन्वय समिती

ज्ञान पोस्ट’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन