vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जुलैमध्ये मिळणार;शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जुलैमध्ये मिळणार;शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

राज्य प्रतिनिधी- बुलढाणा,  : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याचा लाभ जुलै, 2025 मध्ये वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 3 हजार 222 शेतकऱ्यांची ई केवायसी आणि 4 हजार 534 शेतकऱ्यांचे आधार सीडिंग प्रलंबित आहे. शेतकऱ्यांनी प्रलंबित ई केवायसी, आधार सीडिंग व बँक खात्याला डिबीटी इनेबल करणे किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये खाते उघडून त्या खात्याला आधार संलग्न करून डिबीटी इनेबल करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्र आणि शासनाकडून वार्षिक प्रत्येकी सहा हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमार्फत वार्षिक प्रत्येकी सहा हजार रुपये शेतकरी कुटुंबांना दिले जात आहेत. त्यासाठी ई-केवायसी आणि आधार सीडींग करणे अत्यावश्यक आहे, नसल्यास शेतकरी लाभापासून वंचित राहतील. त्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि कार्यालय व तालुक्यातील कृषी सहाय्यक किंवा गाव नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा म्हणजे लाभापासून कोणीही वंचित राहणार नाही, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

तीन महिन्यांचे धान्य एकत्र वाटप; ई-पॉस यंत्रणेबाबत अडचणी दूर करण्यासाठी निर्णय

vishwatmaklokswamivarta

नवी दिल्लीत 14 ते 27 नोव्हेंबर कालावधीत 44 वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा· ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेसह जागतिक व्यापार,संस्कृती आणि नवकल्पनांचा भव्य उत्सव

vishwatmaklokswamivarta

आरटीई’ प्रवेशासाठी मुदतवाढ; २ फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज*

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी करण्याचे आवाहन

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू आहे,दुर्घटनाग्रस्त विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी समोर आलेली आहे.

vishwatmaklokswamivarta

महसूल विभागाने जबाबदारी घेऊन कार्य करावे-अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे*महसूल विभागाच्या विविध कार्यालयांना भेटी