गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांमधील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून ‘खड्डेमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांमधील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून ‘खड्डेमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
राज्य प्रतिनिधी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांमधील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून ‘खड्डेमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध प्रमुख शहरांमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विशेष बैठक पार पडली. या बैठकीला दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित राहून खड्डे तात्काळ बुजवण्याचे निर्देश याप्रसंगी त्यांनी दिले.
खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिकांनी तात्काळ कामाला लागावे, पावसाळ्यात तातडीने रस्ते बुजविण्यासाठी प्री कास्ट आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅच यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, तसेच शहरातील अंतर्गत रस्ते विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा, राज्यातील प्रमुख शहरातील विसर्जन मार्ग, मिरवणुकीचे प्रमुख मार्ग, विसर्जन घाट येथील सोयीसुविधांचा आढावा घेऊन या मार्गावर कोणतेही खड्डे असू नयेत यासाठी तातडीने काम सुरू करावे असे सांगितले.
रस्त्यावरील खड्ड्यांची माहिती देण्यासाठी फोन नंबर जाहीर करावे, ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आलेल्या खड्ड्यांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण करावे, शहरातले रस्ते बुजविण्यासाठी २४*७ यंत्रणा सज्ज ठेवावी, चालू असलेल्या कामांची नियमित पाहणी करावी, वेळ पडल्यास आयुक्तांनी कार्यालयात न थांबता प्रत्यक्ष फिल्डवर उतरून रस्त्यांच्या कामांचा आढावा घ्यावा असे निर्देश त्यांनी दिले.
गणेशोत्सव हा राज्यातील महत्त्वाचा आणि अभिमानाचा सण असून तो नीट साजरा होणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याचे आगमनात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे असे आवाहन त्यांनी सर्वांना केले.