vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नागरिकांच्या सुविधेसाठी अधिकच्या परिवहन सेवेचे पर्याय निर्माण करावेत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नागरिकांच्या सुविधेसाठी अधिकच्या परिवहन सेवेचे पर्याय निर्माण करावेत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

राज्य प्रतिनिधी-मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वाहनांच्या संख्येसोबतच प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढत्या प्रवाशी संख्येमुळे सध्या असलेल्या परिवहन सेवेला मर्यादा येत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये कोणत्या मार्गांवर कोणती परिवहन सेवा उपलब्ध करून देता येईल, याबाबत विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्त वर्दळ आहे, अशा ठिकाणी सर्वेक्षण करण्यात यावे. यंत्रणांनी नागरिकांच्या सुविधेसाठी अधिकच्या परिवहन सेवांचे पर्याय निर्माण करावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले.

परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या दालनात वॉटर टॅक्सी, रोप वे, पॉड टॅक्सी यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला नगरविकास विभागाचे अधिकारी मेरी टाईम बोर्डाचे अधिकारी, परिवहन आयुक्त एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

परिवहन विभागाअंतर्गत रोप वे या नवीन परिवहन सेवेच्या स्वतंत्र विषयाचा अंतर्भाव करण्याच्या सूचना देत परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, रोप वे निर्माण करण्याक‍रिता नवीन यंत्रणा निर्माण करावी लागेल. सध्या रोप वे निर्माण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी नवीन नियम तयार करावे. पार्किंगची मोठी समस्या मोठ्या शहरांमध्ये आहे. मुंबई महानगर प्रदेशात मुंबई महागनर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने भूमीगत पार्किंग प्लाझा तयार करण्यासाठी सर्वेक्षण करावे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

 

भूमीगत पार्किंग प्लाझा ठिकाणी व्यावसायिक मॉल असावे. पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी. वांद्रे पूर्व ते कुर्ला दरम्यान 8.8 किलोमीटर अंतराची ही सेवा असून यामध्ये 38 स्थानके असणार आहे. त्यानुसार कामाचे नियोजन करण्याचे निर्देशही मंत्री श्री. सरनाईक यांनी दिले

 

संबंधित पोस्ट

आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते वनहक्क पट्टे वाटप

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन येथे घेतली शपथ

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद प्रश्नोत्तर :ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये कोंम्बिग ऑपरेशनसह ऑल आऊट ऑपरेशन राबवणार– गृह राज्यमंत्री योगेश कदम

उष्माघात कक्षांसह जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज अतिउष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा हायअलर्ट; सर्व रुग्णालयांमध्ये २४ तास विशेष सुविधा उपलब्ध..

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’ मोहिमेत सर्व पालकांनी सहभागी व्हावे रविवार २८ जून रोजी ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजा; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta