vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन-२०२६ कार्यशाळा संपन्न

महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन-२०२६ कार्यशाळा संपन्न

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी-. विकास आयुक्त (उद्योग) यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करुन रोजगार, स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम व निर्यातवृध्दीस चालना देण्यासाठी तसेच उद्योगाच्या विकासाकरिता राज्य तसचे केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना उद्योग विभागामार्फत राबविण्यात येतात. सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनानुसार “महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६” या अंतर्गत जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा (दि.२० फेब्रुवारी) रोजी संपन्न झाली.

या कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती नेहा भोसले, उद्योग सह संचालक, कोकण विभाग, ठाणे, श्रीमती, विजू शिरसाठ, उपसंचालक, अश्विन घोलपकर, DGFT, मुंबई, सहाय्यक व्यवस्थापक, पी. ए. बामणे, अपेडा, मुंबई, व्यवस्थापक, थी, लोहीत रिषी, IDBI, किशोर गिरोला, EoDB, मुंबई, मार्केटिंग एक्झेक्युटीव, अनिकेत कदम व आप्पासाहेब डोईफोडे, भारतीय डाक, सिनियर कन्सलटंट, प्रणव झुंझारराव, EY, मुंबई, शाखा न्यू इंडिया इंन्शुरन्स, मुंबई, व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, प्रबंधक, निशांत जाधव, श्रीमती, आर्य, बी, लोटणकर तसेच जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनेच्या अध्यक्षासह सुमारे २५० पेक्षा अधिक उद्योजक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी उपस्थित उद्योजकांना निर्यात कशी करावी, कोणत्या स्वरूपात करावी याची माहिती दिली तसेच रायगड जिल्हयाच्या निर्यातीत जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन केले व रायगड जिल्ह्यात बांबू औद्योगिक समूह घटक प्रस्तावित असल्याने त्याक्षेत्रातील उद्योजकांना औद्योगिक समूहाचा लाभ होऊन बांबू क्षेत्रात निर्यातीत चालना मिळेल असे सांगितले. महा निर्यात इग्राईट कन्व्हेंशन २०२६ कार्यशाळेस उपस्थित असलेल्या सर्व उद्योजकांसाठी DGFT, अपेडा, IDBI, EoDB, भारतीय डाक, EY, न्यू इंडिया इन्शुरन्स, मैत्री या विभागांचे सादरीकरण करण्यात आले, सदर महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६ कार्यशाळेस रायगड जिल्ह्यातील एकूण २३० पेक्षा अधिक उद्योजकासह जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनाचा सहभाग होता.

उद्योग सह संचालक, कोकण विभाग, ठाणे यांनी महा निर्यात इग्राईट मान्व्हेंशन २०२६ कार्यशाळेची प्रास्ताविक केले व उद्योग विभागातील निर्यातभिमूख योजनांची माहिती उपस्थित उद्योजकांना देण्यात आली.

एम.एम.पालकर, उद्योग निरिक्षक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड यांनी जिल्ह्यातील उद्योगांच्या विकासाकरिता जिल्हाधिकारी यांच्या सूक्ष्म नियोजन व सक्रिय सहभाग असल्याने उद्योगाचा विकास प्राधान्याने होत असल्याचे नमूद करुन विकास आयुक्त (उद्योग) यांच्या मार्गदर्शनाने आजची महा निर्यात इग्राईट कन्व्हेंशन २०२६ कार्यशाळेचे आयोजन केल्याचे नमूद केले, उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करुन निर्यात कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.

00000000

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2025 चे आयोजन उद्योजक,नवउद्योजक, गुंतवणूकदारांनी उपस्थित राहावे

4 सप्टेंबरला पोलिस पाटील भरतीसाठी आरक्षण सोडत

vishwatmaklokswamivarta

राज्यातल्या 29 महानगरपालिकांपैकी 22 पेक्षा अधिक महापालिका जिंकत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ठरला सर्वांत मोठा विजयी पक्ष.

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका ‘एक्स-आयएनएस गुलदार’ समुद्रतळावर यशस्वीरित्या स्थापित..महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटन प्रकल्प…

डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी – मंत्री छगन भुजबळ प्रा. डॉ. पुरंदरे यांचा गौरव सोहळा व ‘हँड्स दॅट हील्ड, अ हार्ट दॅट लेड’ आत्मचरित्राचे प्रकाशन

सातारा जिल्ह्याला जागतिक पर्यटन हब बनविण्यासाठी कोयना- दौलत डोंगरी महोत्सवासारखे महोत्सव ही काळाची गरज- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे