vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

4 सप्टेंबरला पोलिस पाटील भरतीसाठी आरक्षण सोडत

4 सप्टेंबरला पोलिस पाटील भरतीसाठी आरक्षण सोडत

जालना प्रतिनिधी :- जालना उपविभागातील समाविष्ट असणाऱ्या जालना व बदनापूर तालुक्यातील एकुण 185 गावांतील पोलिस पाटील रिक्त पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तरी पोलिस पाटील रिक्त पदाची भरती प्रक्रियेसाठी गावनिहाय, जात प्रवर्गनिहाय, रिक्त पदाच्या तीस टक्के महिला आरक्षण सोडत गुरुवार दि.4 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात काढण्यात येणार आहे. पोलिस पाटील सरळसेवा एकुण मंजूर पदे 226 असून 41 पदे भरलेली आहेत तर 185 पदे रिक्त आहेत. ज्या नागरिकांना आरक्षणावर आक्षेप, हरकत असेल त्यांनी लेखी स्वरुपात आपले आक्षेप उपविभागीय अधिकारी, जालना येथे समक्ष उपस्थित राहून दि.8 ते 10 सप्टेंबर 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जालना उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-

संबंधित पोस्ट

कारागृहात निर्मित वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

अनेक वर्षांपासूनच्या सुराज्य अभियानच्या मागणीला यश !खाजगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून होणारी लुटमार थांबवण्यासाठी कायदा करणार !- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, महाराष्ट्र राज्य

लोकायुक्त संस्थेच्या चार सदस्यांचा शपथविधी संपन्न· राज्यपालांकडून न्यायिक व बिगर न्यायिक सदस्यांना शपथ…

एसआरएअंतर्गत झोपडपट्टी पुनर्विकासासाठी समूह पुनर्विकास योजना राबविणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महसूल सुनावण्या डिजिटल होणार! महसूल विभागाचे महत्वाकांक्षी पाऊल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात’प्रत्यय’ ऑनलाइन प्रणालीची अंमलबजावणी श्रम आणि पैशांची होणार मोठी बचत…

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजनांची कामेगतीने पूर्ण करावीत- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील