vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एसएसबी परीक्षेच्या मोफत प्रशिक्षणासाठी 17 सप्टेंबरला मुलाखती 

एसएसबी परीक्षेच्या मोफत प्रशिक्षणासाठी 17 सप्टेंबरला मुलाखती

राज्य प्रतिनिधी: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दि. 22 सप्टेंबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2025 या कालावधीत एस.एस.बी. कोर्स क्र. 62 आयोजित करण्यात येत आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली येथे दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. मुलाखतीस येते वेळी उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील एस.एस.बी. 62 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

 एस.एस.बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवून यावेत – (अ) कंम्बाईड डिफेन्स सव्हीसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. (ब) एनसीसी ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एस.एस.बी. साठी शिफारस केलेली असावी. (क) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. (ड) विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एस.एस.बी. कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0233-2990712 आणि 0253-2451032 किंवा व्हॉटसअप क्र. 9404969145 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

शिक्षक पात्रता परीक्षाचे प्रमाणपत्रांचे वितरण 1 ते 9 सप्टेंबर दरम्यान;उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

जिल्ह्यातील गोरगरीबांसाठी पक्की घरे हेच ध्येय – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पात्र व्यक्तींना तात्काळ पट्टे वाटप करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

पैठणला १००, पाचोडला ५० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करा- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर,कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्यसेवेला नवी बळकटी

vishwatmaklokswamivarta

गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रिया १५ मे पर्यंत पूर्ण करा- विभागीय आयुक्त जी. श्रीकांत विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय आढावा

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राटडॉ. मिर्झा यांचे अमरावती येथे निधन

vishwatmaklokswamivarta

वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रथम सत्रासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची 10 जून मुदत..