vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सैनिकी सेवापुर्व शिक्षण संस्थेत शारिरीक प्रशिक्षण निदेशकाची आवश्यकता

सैनिकी सेवापुर्व शिक्षण संस्थेत शारिरीक प्रशिक्षण निदेशकाची आवश्यकता

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी मुलींच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था नाशिक येथे महिला शारिरीक प्रशिक्षण निदेशकाची आवश्यकता आहे. एका पदावर ही भरती होणार असून ही अशासकीय भरती निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात व कंत्राटी पद्धतीने असेल. वसतीगृहात राहण्यास इच्छुक असावे. शारिरीक शिक्षण या विषयात पदवी वा पदव्युत्तर शिक्षण झालेल्या महिला उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज व आवश्यक कागदपत्रासह अर्जदारांनी मंगळवार दि.२७ रोजी सकाळी ११ वा. सैनिकी सेवापुर्व शिक्षण संस्था एन १२ सेक्टर, सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था येथे ९७०३५४८४५७ व ९८५०५२५६३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संचालक निवृत्त कर्नल मकरंद देशमुख यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

संविधान गौरव संमेलन-लोकांच्या मनामनात रुजवावे संविधान- पालकमंत्री संजय शिरसाट

अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत – रोहयो मंत्री भरत गोगावले

vishwatmaklokswamivarta

उद्योगांना आवश्यक कौशल्यधारक मनुष्यबळ उपलब्धतेसाठीशासन कटिबद्ध- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

महाडीबीटी पोर्टलवर प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जाबाबत समाज कल्याणच्या सूचना-शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून महाडीबीटी व्हर्जन 2.00 कार्यान्वित

vishwatmaklokswamivarta

दहावी, बारावी शालांत परीक्षा; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज; शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन – पालकमंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही

vishwatmaklokswamivarta