vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

श्रीगणेशोत्सव २०२६’ च्या अनुषंगाने महापौर श्रीमती रितू तावडे आणि उप महापौर श्री. संजय घाडी यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका पदाधिकारी, श्रीगणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी  अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न

श्रीगणेशोत्सव २०२६’ च्या अनुषंगाने महापौर श्रीमती रितू तावडे आणि उप महापौर श्री. संजय घाडी यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका पदाधिकारी, श्रीगणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी  अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न

मुंबई प्रतिनिधी-श्रीगणेशोत्सव २०२६’ च्या अनुषंगाने महापौर श्रीमती रितू तावडे आणि उप महापौर श्री. संजय घाडी यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका पदाधिकारी, श्रीगणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी आणि अधिकारी यांची आज महानगरपालिका मुख्यालयात आढावा बैठक पार पडली

🔷श्रीगणेशोत्सव कालावधीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि महापौर वैद्यकीय सहायता निधीतून मुंबईत ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केली

🔷या विशेष उपक्रमांतर्गत श्रीगणेश मंडळांच्या सभामंडपात श्रीगणेश भक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार असून, यासाठी गणेश मंडळांनी आपल्या मंडपात किंवा मंडप परिसरात या शिबिरासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केले आहे.

🔷बैठकीस उप महापौर श्री. संजय घाडी, सभागृह नेता श्री. गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेता श्री. अमेय घोले, एआयएमआयएमचे गटनेता श्री. विजय उबाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेता श्री. यशवंत किल्लेदार, समाजवादी पक्षाच्या गटनेता श्रीमती अम्रीन अब्रहानी, सुधार समिती अध्यक्ष श्रीमती संध्या दोशी-सक्रे, बेस्ट समिती अध्यक्ष श्रीमती तृष्णा विश्वासराव यांच्यासह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सर्व परिमंडळांचे सह आयुक्त, उप आयुक्त, विविध विभागांचे अधिकारी, विविध प्राधिकरणांचे अधिकारी, पोलिस आणि वाहतूक विभागाचे अधिकारी यांच्यासह बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेश उत्सव समन्वय समिती, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघांसह विविध श्रीगणेशोत्सव समन्वय समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली, उप समिती प्रस्ताव तयार करत असल्याची चर्चा..

vishwatmaklokswamivarta

माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार- राज्‍य माहिती आयुक्त गजानन निमदेव

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र युवा जलदूत’ देणार जलसंधारणाचा संदेश

शाळेच्या पहिल्या दिवशी होणार विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; विविध उपक्रमांचे आयोजन