vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण-निवडणूक नोंदणी अधिकारी  आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण-निवडणूक नोंदणी अधिकारी  आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आज विले पार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

🔷अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई शहर जिल्हा) श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई उपनगर जिल्हा) श्री. सौरभ कटियार, महानगरपालिकेचे सह आयुक्त (कर निर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार आदी उपस्थित होते.

🔷एकही पात्र नागरिक मतदार यादीतून वगळला जाणार नाही आणि एकही अपात्र व्यक्ती मतदार यादीत समाविष्ट होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ नंतर वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नव मतदार युवक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करून नमुना क्रमांक ६ भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोक्कलिंगम यांनी यावेळी दिले.

 

#mybmcupdates

#SIR

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे दि.08 ते 14 एप्रिल या कालावधीत आयोजन

रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्वदेस फाउंडेशन यांच्यातसात तालुक्यामध्ये आरोग्य सुधारण्यासाठी सामंजस्य करार

सामूहिक तक्रारीनंतर व बातम्यांच्या दणक्याने फेब्रुवारी मार्चपासून धारावीकरांना लाईट बिल घरपोच…

गेल्या काही दशकांपासून पारशी लोकसंख्येत लक्षणीय घट होत आहे. पारशी समाजाच्या सतत घटणाऱ्या लोकसंख्येवर उपाययोजना म्हणून-जिओ पारसी” योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समिती स्थापन..

बालगृहातील मुलांना शिक्षणासह सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

आज*राष्ट्रीय लोकअदालतीचे  आयोजन*

vishwatmaklokswamivarta