vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आज*राष्ट्रीय लोकअदालतीचे  आयोजन*

आज*राष्ट्रीय लोकअदालतीचे  आयोजन*

 

सातारा, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्या मार्फत शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हयातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. तडजोड होवू शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी १३ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवावयाची असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवावयाचे आहे असे संबंधित अधीक्षक अथवा लिपिक तसेच संबंधित वकिलांना कळवावे. लोक अदालतीत तडजोड झाल्याने कायमस्वरुपी वाद मिटू शकेल, शुल्लक वादाचे पर्यावसन कायमस्वरुपी वादात होणार नाही. हाच लोक अदालतीचा हेतू आहे. शिवाय लोक अदालतीतील निकालाविरुध्द अपील होत नाही, वेळ व पैशाची बचत होते.

लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी कौटुंबिक वाद, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे ठेवावयाची असल्यास संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. वाघमारे यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

आज 16 जुलैपासून सुरु होणा-या नमुंमपा पदभरतीसाठी नियोजित केंद्रांवरील व्यवस्थेची समन्वय अधिका-यांकडून काटेकोर पाहणी…

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ साठी नाव नोंदणी करून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजीचा अधिक चांगला वापर करण्याबाबत प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सरकारने उचललेली पावले

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा विभागामार्फत “अभिजात मराठी माझ्या अपेक्षा”या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

सार्वजनिक आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालकमंत्र्यांनी केले लातूर जिल्हा प्रशासनाचे अभिनंद• दोन वर्षांत १९ आरोग्य संस्थांना मिळाले राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन• राज्यात प्रथमच ग्रामीण रुग्णालयाला एनक्यूएएस मानांकन