vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मराठी भाषा विभागामार्फत “अभिजात मराठी माझ्या अपेक्षा”या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मराठी भाषा विभागामार्फत “अभिजात मराठी माझ्या अपेक्षा”या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मुंबई, प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या 3 ऑक्टोबर 2024 च्या अधिसूचनेन्वये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस तर 3 ते 9 ऑक्टोबर हा सप्ताह अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.

अभिजात मराठी भाषा सप्ताह मध्ये मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा दूत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा जगभरातील 18 ते 21 वयोगटातील मराठी बोलणाऱ्यांसाठी खुली असेल. “अभिजात मराठी-माझ्या अपेक्षा” या विषयावर जास्तीत जास्त तीन मिनिटांचा वेळ प्रत्येक स्पर्धकाला देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे संयोजन ऑगस्ट मीडिया या संस्थेतर्फे केले जाईल. ही वक्तृत्व स्पर्धा 8 ते 22 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. महाराष्ट्रातील वेगवेगळे महसूल विभाग तसेच बृहन्महाराष्ट्र मिळून प्रथम नोंदणी करणाऱ्या 1000 स्पर्धकांना प्रवेश मिळेल.

स्पर्धकांनी विषयाचे आकलन करून तो विषय आपल्या पद्धतीने मांडणे अपेक्षित आहे. यामधून जास्तीत जास्त 100 उत्तम स्पर्धकांची निवड “मराठी भाषा दूत” म्हणून करण्यात येईल. तसेच, सर्व सहभागींना महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. यासाठी गुगल फॉर्म पाठवण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2025, रात्री 12 पर्यंत आहे.

या स्पर्धेसाठी 18 ते 21 या वयोगटातील जास्तीत जास्त युवकांनी ऑनलाईन स्पर्धेमध्ये https://forms.gle/NYvWxvYCSFXCjkzn9 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन मराठी भाषा विभागातर्फे करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

भारतभेटीने प्रभावित झाल्याची पॅराग्वे राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांची भावनापॅराग्वेच्या राष्ट्राध्यक्षांचे राजभवन येथे स्वागत-संघटित गुन्हेगारी, ड्रग माफियांचे संकट दूर करण्यासाठी पॅराग्वेला सहकार्याची अपेक्षा..

 शहरातील शाळा इमारतींच्या फायर ऑडिट संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

फुलंब्री येथे तालुकास्तरीय महिला सक्षमीकरण व संवाद कार्यशाळा-संस्कारयुक्त शिक्षणातून सक्षम पिढी घडवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर कारागृहाला प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांची भेट

अनुसूचित जमाती कल्याण समितीची शाळा, आरोग्य केंद्राला भेटी

वसई-विरार घनकचरा व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती गठीत- मंत्री उदय सामंत