vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जमाती कल्याण समितीची शाळा, आरोग्य केंद्राला भेटी

अनुसूचित जमाती कल्याण समितीची शाळा, आरोग्य केंद्राला भेटी

    अमरावती, प्रतिनिधी: अनुसूचित जमाती कल्याण समितीने आज मेघाटातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. यात समितीने शाळा, आरोग्य उपकेंद्र आदींना भेट दिली.    या पाहणी दौऱ्यात समितीचे प्रमुख दौलत दरोडा यांच्यासह समितीचे सदस्य हरिशचंद्र भोये, केवलराम काळे, राजू तोडसाम, शांताराम मोरे, मंजुळा गावित, रामदास मसराम, उमा खापरे, राजेश राठोड, विनोद निकोले सहभागी झाले आहेत.   आजच्या पाहणी दौऱ्यात समिती सदस्यांनी सकाळी एकलव्य मॉडेल स्कूलच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी इमारतीची तातडीने दुरुस्ती करून शाळा सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर देवी पॉइंट येथे भेट दिली. मोथा येथील जिल्हा परिषदेच्या पूर्व माध्यमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यानंतर मोथा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला भेट दिली. तसेच अंगणवाडीची पाहणी केली.  समिती सदस्यांनी मडकी येथील उमेद बचत गटाच्या स्टॉलला भेट देऊन त्यांच्या कार्याची माहिती घेतली. त्यानंतर चिखलदरा नगरपरिषदेला भेट दिली. समिती सदस्यांनी सीमाडोह वन संकुलाला भेट दिली. मेळघाटातील आकर्षण असलेल्या कोलकाज येथील विश्रामगृहाला भेट देऊन पाहणी केली. सिपणा वन्यजीवच्या उपवनसंरक्षक नीता कट्टे यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाबद्दल माहिती दिली.

00000

संबंधित पोस्ट

इंडिगो आणखी अडचणीत– 5 वर्षांपूर्वीचं कोट्यवधींचं प्रकरण समोर, नोटिस जारी

vishwatmaklokswamivarta

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी प्रस्ताव करण्यास मुदतवाढ

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशित

vishwatmaklokswamivarta

डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण: पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक

vishwatmaklokswamivarta

ई-पिक पाहणीसाठी 15 जानेवारीपर्यंत नोंदणी करा; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन…

जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करणार- वनमंत्री गणेश नाईक,वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी महत्वाचे निर्णय-त्वरित 200 पिंजरे बसविणार, आणखी 1 हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करणार नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी निधी कमी पडू देणार नाही· बिबट्यांच्या हालचालीची माहिती देण्यासाठी एआयचा वापर करणार· नसबंदीसाठी केंद्रीय वन मंत्र्यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटणार· शेती व गोठ्यांना सौर कुंपण करणार

vishwatmaklokswamivarta