vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ई-पिक पाहणीसाठी 15 जानेवारीपर्यंत नोंदणी करा; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन…

ई-पिक पाहणीसाठी 15 जानेवारीपर्यंत नोंदणी करा; जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन…

 

            बुलढाणा, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ई-पिक पाहणीची सुरुवात दि. 1 डिसेंबरपासून सुरू झाला आहे. यात सातबारावर पिकपेरा स्वतः शेतकऱ्यांनी अॅन्ड्राईड फोनद्वारे नोंदणी करावी लागणार आहे. शेतकरीस्तरावर पिक पाहणी करण्यासाठी अंतिम दि. 15 जानेवारी 2025 पर्यंत आहे. त्याअनुषंगाने सर्व शेतकरी बांधवांनी विहित मुदतीत आपल्या पीकांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी केली आहे.

रब्बी हंगामी 2024 ई-पिक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात आजरोजी पर्यंत 7 लाख 56 हजार 535 हे. आर. क्षेत्रापैकी 1 लाख 46 हजार 532.04 हे. आर क्षेत्रावर, तसेच एकूण 8 लक्ष 36 हजार 033 पिक पाहणी करावयाच्या खातेदारापैकी 141989 प्लॉटवर सबंधित शेतकऱ्यांनी आपल्या पीकांची ई-पीक पाहणी डिसीएस व्हर्जन 3.0 या मोबाईल ॲप द्वारे आपल्या सातबारा वर नोंदणी केलेली आहे. आजवर बुलढाणा जिल्ह्यात डिजटल क्रॉप सर्वे अंतर्गत ई पीक पाहणीची नोंदणी 19.37 टक्के क्षेत्रावर झोलेली आहे. उर्वरित क्षेत्रावर सर्व शेतकरी बांधावांना ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीकांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पीक पाहणीची नोंदणी ई-पीक पाहणी व्हर्जन 3.0 या मोबाईल ॲपद्वारे करतांना ॲन्ड्रॉईड फोन आवश्यक आहे. सदर ॲप गूगल क्रोम अपडेट करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यावे. ई पीक पाहणी ॲपद्वारे शेतकरी बांधावर जावुन पीकांची नोंदणी करून माहिती अपलोड करावी. सदर कामी संबंधीत शेतकऱ्याजवळ मोबाईल उपलब्ध नसल्यास, संबंधीत गावाचे तलाठी, कोतवाल तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर यांची मदत घेवून आपल्या पीकांची नोंदणी ई पिक पाहणी ॲप द्वारे करून घेण्यात यावी. सदर ॲपविषयी काही अडचण असल्यास संबंधीत गावाचे तलाठी तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर, आपल्या गावातील डिसीएसकरिता नियुक्त सहाय्यक यांची मदत घ्यावी.

ई पीक पाहणी द्वारे पीकांची नोंदणी न केल्यास आपल्या सातबारा वर पीक पेरा कोरा राहील. जो नंतर भरता येत नाही त्यामूळे पीक विमा व इतर शासकीय अनुदान व लाभ मिळविण्यास अडचण निर्माण होईल. अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गीक आपत्ती या बाबत पिक विमा मिळण्यासाठी सातबारा वर अचूक पीक नोंद असणे आवश्यक आहे. 00000000

संबंधित पोस्ट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्याची संधीचिखली तालुक्यात मंडळ व तहसील स्तरावर तीन टप्प्यांत लोक अदालतींचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

कनेक्टिंग लिंकच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळलेल्या घटनेची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

विधानसभा निवेदन :राज्याचे भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभारणार- सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

गोड्या पाण्यातील मासेमारी वाढवण्यासाठी धोरण तयार करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मत्स्य व्यवसाय विभागाच्या १०० दिवसाच्या नियोजनाचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta