vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उच्चशिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहासाठी १२०० कोटी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री- संजय शिरसाट 

उच्चशिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहासाठी १२०० कोटी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री- संजय शिरसाट

राज्य प्रतिनिधी-📍 नागपूर उच्चशिक्षण घेणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे व त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व वसतिगृहासाठी १२०० कोटी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. सेंटर पाईंट हॉटेल येथे सामाजिक न्याय विभागातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संवाद – देशाच्या भविष्याशी या कार्यक्रमात ते बोलत होते.

वसतिगृहात नवीन २५ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी नवी योजना आणण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थी घडविणे सामाजिक न्याय विभागाचे काम असून केंद्रस्थानी विद्यार्थी राहील यावर विभागाने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी मंत्री शिरसाट यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदा तसेच इतर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खुंटेफळ साठवण तलाव तसेच शिंपोरा ते खुंटेफळ बोगदा कामाचे भूमिपूजन,नदीजोड प्रकल्पातून मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही…

vishwatmaklokswamivarta

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा-पालखी सोहळ्याच्या काळात पालखी मार्गावर पोलीस दलाकडून इतर वाहनांना मनाई आदेश जारी*

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनामका खरेदीकरिता 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी…

vishwatmaklokswamivarta

इतर मागास बहुजन कल्याण विभाग)विभागाच्या आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आश्वासित प्रगती योजना..

श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास_*श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाकडून आयोजन*श्रीकृष्ण जन्मभूमी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी वैश्विक श्रीनारायण महायज्ञाचे वरळी, मुंबई येथे आयोजन* 

vishwatmaklokswamivarta

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागात विविध पदासाठी भरती- शिकाऊ उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन