vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा-पालखी सोहळ्याच्या काळात पालखी मार्गावर पोलीस दलाकडून इतर वाहनांना मनाई आदेश जारी*

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा-पालखी सोहळ्याच्या काळात पालखी मार्गावर पोलीस दलाकडून इतर वाहनांना मनाई आदेश जारी*

सातारा प्रतिनिधी- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि.२६ ते ३० जून अखेर सातारा जिल्हयातुन मार्गक्रमण करणार असुन सदर पालखी सोहळा पुणे जिल्हयातुन सातारा जिल्हयात दि. २६ जून रोजी पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार असुन त्यानंतर लोणंद, तरडगांव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुन 30 जून रोजी सोलापूर जिल्हयात जाणार आहे. पालखी सोहळा हा निरा लोणंद फलटण मार्गे पंढरपुर रस्त्याने जाणार असलेने तसेच पालखी सोहळयात लाखो भाविक सहभागी होणार असल्याने पालखी जाणारे मार्गावर कोणताही अपघात घड्डु नये, वाहतुक समस्या निर्माण होवू नये तसेच अनुचीत प्रकार घड्डु नये याकरीता सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पालखी सोहळयातील वाहनांखेरीज व अत्यावश्यक सेवेतील (पोलीस, रूग्णवाहीका, अग्निशामक वाहने) खेरीज करून इतर सर्व वाहनांना निरा लोणंद पंढरपूर मार्गावर 25 ते 30 जून या कालावधीत प्रवेश करण्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३४ प्रमाणे अधिसूचनेने मनाई आदेश जारी केला आहे.

दि.25 जून रोजीचे सकाळी ६ ते २९ जून रोजीचे रात्री २४ वाजेपर्यत फलटण येथून पुणे, निरा, लोणंद कडे जाणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पूणेकडे शिरगांव घाटातून वळविणेत येत आहे.

दि. 25 जून रोजीचे सकाळी ६ ते 28 जून रोजीचे रात्री २४ वाजेपर्यत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळयातील येणारे वाहनाखेरीज इतर वाहनांना बंद करणेत येत आहे.

दि.२५ जून रोजीचे सकाळी ९ पासून ते दि.३० जून रोजीचे १३ वा. पर्यंत लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदर्की मार्गे फलटणकडे वळविण्यात येत आहे.दिनांक २५ जून रोजीचे मध्यरात्री ००.०० वा. ते दिनांक २९ जून रोजीचे २४ वा.पर्यंत फलटण ते लोणंद या मार्गावरील वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.

दि.२८ जून रोजीचे मध्यरात्री ००.०० पासून ते दि.३० जून रोजीचे १६ वा. पर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.दि.२८ जून रोजीचे मध्यरात्री ००.०० पासून ते दि.३० जून रोजीचे २४ वा. पर्यंत नातेपुते कडुन पुणे बाजुकडे जाणारी वाहतुक माळशिरस, अकलुज येथुन बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.

दि.२८ जून रोजीचे मध्यरात्री ००.०० पासून ते दि.३० जून रोजीचे १६ वा. पर्यंत नातेपुते कडुन फलटण मार्गे साताराकडे जाणारी वाहतुक शिंगणापुर तिकाटणे मागे दहीवडी-सातारा अशी वळविण्यात येत आहे. नातेपुते कडुन पुण्याकडे जाणारी वाहतुक नातेपुते-दहीगाव-जांब-बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येतआहे.

दि.२८ जून रोजीचे मध्यरात्री ००.०० पासून ते दि.३० जून रोजीचे १४ वा. पर्यंत नातेपुते-वाई-वाठारकडे जाणारी वाहतुक शिंगणापुर तिकाटणे-शिंगणापुर-जायली-कोळकी-झिरणवाडी-चिंचुणी-ढवळपाटी-वाठार फाटा मागे वळविण्यात येत आहे.

दि. २९ जून रोजी पालखी सोहळा हा फलटण येथुन पुढील बरड मुक्कामी सकाळी ६ वा. मार्गस्थ होणार आहे. सदर वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होवु नये महणुन पालखीतील वाहने फलटण ते पंढरपुर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण दहीवडी चोक-कोळकी शिंगणापूर तिकाटणे-बडले-पिंप्रद बरड अशी वळविण्यात येत आहे.

पालखी सोहळा दरम्यान पालखी मार्गावरील पालखी सोहळयातील वाहनाखेरीज इतर सर्व बाहने पर्यायी मार्गाने ये-जा करतील याची इतर वाहनधारकांनी नोंद घ्यावी असे सातारा जिल्हा पोलीस दलाकडून कळविण्यात आले आहे.

000

संबंधित पोस्ट

पुढील सात दिवस महाराष्ट्रात  मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याचा अंदाज

गणेश उत्सवासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 198 खासगी तर 286 सार्वजनिक मंडळाचे गणपती उत्सवासाठी गावी परतणाऱ्या कोकण वासियांच्या सुविधांसाठी यंत्रणा सतर्क…

खुलताबाद कडे जाणाऱ्या वाहतुक मार्गात बदल

आरएनआय कडून ९९ हजार वृत्तपत्रांवर बंदी‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने व्यक्त केली तीव्र नाराजीस्थानिक पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न – संदीप काळे

टोयोटा कंपनीचे उच्च अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची भेट,शिक्षण, आरोग्य आणि सौर ऊर्जा निर्मिती साठी एकत्र काम करणार..    -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा…