vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पर्यटन क्षेत्रातील कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर आवश्यक – आनंद महुरकर जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा उपक्रम

पर्यटन क्षेत्रातील कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर आवश्यक – आनंद महुरकर,जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा उपक्रम..

मुंबई, प्रतिनिधी : पर्यटन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व वाढत असून पर्यटन सेवा, संवाद, सेवा पुरवठा आणि दैनंदिन व्यावसायिक कामकाजात तिचा प्रभावी वापर करता येऊ शकतो, असे मार्गदर्शन ‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’, अमेरिकेचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद महुरकर यांनी केले.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने ‘नवोदितांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर विशेष वेबिनार आयोजित केला होता. यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाची ‘डिजिटल अजेंडा अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स टू रिडिझाइन टुरिझम’ ही संकल्पना लक्षात घेऊन या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश र. गटणे ऑनलाइन उपस्थित होते.

श्री. महुरकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मूलभूत संकल्पनांची माहिती देत पर्यटन क्षेत्रातील तिचे वाढते महत्त्व आणि संभाव्य उपयोग स्पष्ट केले. नाथ स्कूल ऑफ बिझनेस अँड टेक्नॉलॉजीचे संचालक हर्षवर्धन जाजू यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि बदलत्या अंकीय विश्वाविषयी विचार मांडले.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली, तसेच पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश र. गटणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

महामंडळाचे मुख्यालय, प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवासस्थाने, नौकाविहार केंद्रे, उपाहारगृहे, अभ्यागत केंद्रे, कलाग्राम आणि अभियांत्रिकी विभागातील अधिकारी व कर्मचारी या परिसंवादात सहभागी झाले. पर्यटन क्षेत्रातील संबंधित घटक आणि पर्यटन संघटनांच्या प्रतिनिधींनाही सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि व्यवसाय विकास विभागाच्या प्रमुख मानसी कोठारे यांनी परिसंवादाच्या आयोजन व अंमलबजावणीची जबाबदारी सांभाळली. संजय देखणे यांनी आभार मानले.

 

०००००

संबंधित पोस्ट

६ जुलै या दिवशी असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने …..आषाढी एकादशी – इतिहास आणि महत्त्व

टंचाई सदृश्य गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आराखडा- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

परभणी जिल्ह्याच्या विकासाला गती; विविध योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण बदल – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

भगवान महावीर अध्यासनासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या दरांमध्ये सुधारणा करणार – केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया

लातूर जिल्ह्यात १७४ उमेदवारांना शासकीय सेवेत नियुक्ती !शासकीय नोकरी ही समाजसेवेची संधी समजून काम करा- पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले अनुकंपा धोरणातील बदलामुळे नियुक्ती प्रक्रिया गतिमान