भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी
सातारा प्रतिनिधी : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावरभरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक १९ ते २८ ऑक्टोबर कालावधीत एसएसबी कोर्स आयोजित करण्यात येत आहे.
अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी: training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र.
०२५३-२४५१०३२ किंवा व्हाट्सअप क्र. ९१५६०७३३०६ कार्यालयीन वेळेत दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.