vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे राखीव प्रवर्गाचे 389 अर्ज प्राप्त- मेघराज भाते

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे राखीव प्रवर्गाचे 389 अर्ज प्राप्त- मेघराज भाते

 

सांगली, प्रतिनिधी : नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025 जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ते नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याची शेवटची तारीख दि.17.11.2025 रोजी दु. 3.00 वा. पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयास राखीव प्रवर्गाचे सांगली जिल्ह्यातून 296 व अन्य जिल्ह्यातून 93 असे एकूण 389 अर्ज जात पडताळणीसाठी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025 च्या अनुषंगाने दि. १५ व दि. १६ नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशीही निवडणूकविषयक जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज स्वीकृतीकरिता कार्यालय सुरु ठेवण्यात आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2025 जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ते नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याची शेवटची तारीख दि. 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत समिती कार्यालयास प्राप्त जात प्रमाणपत्र पडताळणी अर्जांची नगरपरिषद व नगरपंचायत निहाय प्रकरणांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

आटपाडी नगरपंचायत -49, शिराळा नगरपंचायत – 31, आष्टा नगरपरिषद – 40, जत नगरपरिषद – 32, पलूस नगरपरिषद – 28, तासगांव नगरपरिषद – 28, इस्लामपूर/ईश्वरपूर नगरपरिषद – 56, विटा नगरपरिषद – 32 असे एकूण 296 अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तर नगरपंचायत निवडणुकीसाठी इतर जिल्ह्यातून 5 तसेच नगरपरिषद निवडणुकीसाठी इतर जिल्ह्यातून 88 असे एकूण 93 अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

ग्रामीण कला-संस्कृती अनुभवण्यासाठी ‘महालक्षमी सरस’ ला आवर्जून भेट द्यावी- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – 2025 लादि. 11 फेब्रुवारी पासून सुरुवात

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सदनात सूर-संगम संगीतमय कार्यक्रम गणेशोत्सवात मराठी संस्कृतीचा जागर

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे दोन दिवसीय जालना ग्रंथोत्सवाचे आयोजन 10 व 11 मार्चला ग्रंथ प्रदर्शन, विक्री, साहित्यिक मेळावा, परिसंवाद,       सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च उपक्रमांची राहणार रेलच· महोत्सवात पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री मुख्य आकर्षण

इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळेमहाराष्ट्रात उद्योजकांसाठी पोषक वातावरण— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात पुढाकार घेण्याचे केले आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी-दि.26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त पंतप्रधानांनी केली मदतीची घोषणा

vishwatmaklokswamivarta