vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे दोन दिवसीय जालना ग्रंथोत्सवाचे आयोजन 10 व 11 मार्चला ग्रंथ प्रदर्शन, विक्री, साहित्यिक मेळावा, परिसंवाद,       सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च उपक्रमांची राहणार रेलच· महोत्सवात पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री मुख्य आकर्षण

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे दोन दिवसीय जालना ग्रंथोत्सवाचे आयोजन 10 व 11 मार्चला ग्रंथ प्रदर्शन, विक्री, साहित्यिक मेळावा, परिसंवाद,       सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च उपक्रमांची राहणार रेलच· महोत्सवात पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री मुख्य आकर्षण

 

जालना, प्रतिनिधी:- धावपळीच्या युगात लोप पावत चाललेली वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि तिचा विस्तार करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जालना जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने येत्या 10 व 11 मार्च रोजी ‘जालना ग्रंथोत्सव 2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. टाऊन हॉलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात होणाऱ्या या दोन दिवसीय महोत्सवात ग्रंथप्रदर्शन, साहित्यिक मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर ठाकूर यांनी दिली.

ग्रंथोत्सवाचा प्रारंभ मंगळवार दि.10 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता गांधी चमन येथून निघणाऱ्या भव्य ग्रंथदिंडीने होईल. महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन होणार असून, विनीत साहनी, सुनील लोणकर आणि प्रा. पंढरीनाथ सारके यांची प्रमुख उपस्थिती असेल.

महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन सकाळी 11 वाजता जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत पोतदार हे या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवतील. याप्रसंगी खासदार डॉ. कल्याण काळे, खासदार संजय जाधव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

ग्रंथोत्सवात विविध विषयांवर अभ्यासपूर्ण परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी 3 वाजता श्रीनिवास म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली बदलत्या काळातील वाचन संस्कृती या विषयावर चर्चा होईल. बुधवारी सकाळी 11 वाजता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्या उपस्थितीत स्पर्धा परीक्षा-काळाची गरज हा परिसंवाद रंगणार आहे. तर दुपारी 3 वाजता संतोष तांबे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक हे ग्रंथालय चळवळीचे योगदान या विषयावर आपले विचार मांडतील.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मंगळवारी दुपारी ‘मी सावित्री’ तर बुधवारी दुपारी ‘मी धर्मवीर’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. बुधवारी सायंकाळी 4 वाजता अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथोत्सवाचा समारोप होईल. या महोत्सवात पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री हे मुख्य आकर्षण असणार आहे. प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या ज्ञानयज्ञात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने केले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

सातारा जिल्ह्यात चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा बियाणे वाटप मोहीम

सांगली फळ महोत्सवात नऊ लाखांची उलाढाल – पणन अधिकारी ओंकार माने- शेतकऱ्यांनी मानले जिल्हाधिकारी अशोक काकडे, पणन विभागाचे आभार…

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी;आरोग्य सल्ला आरोग्य सांभाळण्यास प्राधान्य द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात3 हजार 953 उपक्रम राबविल्याची प्रथमच नोंदअप आधारित महाकृषी खरीप मोहिम यशस्वी..

गांधी शांती परिक्षेत जिल्हा कारागृहातील 23 महिला व पुरुष बंद्यांचा सहभाग

महाराष्ट्र राज्यातील बीडच्या सरपंचाची खंडणी-हत्या: आरोपी वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी….

vishwatmaklokswamivarta